किडनी स्टोनवरील रामबाण उपाय! ‘ही’ हिरवी पाने खाल्ल्यास ऑपरेशनचीही गरज पडणार नाही

Published on -

पोटात स्टोन्स असल्याचे निदान झाले की अनेकांचे पहिलेच वाक्य असते “शस्त्रक्रिया करावी लागेल का?” कारण ही समस्या जितकी सामान्य आहे, तितकीच ती वेदनादायक आणि खर्चिक ठरते. पण आयुर्वेदात अशी काही नैसर्गिक साधनं आहेत, जी शस्त्रक्रियेचा पर्याय बनू शकतात. त्यातील एक म्हणजे पत्तरचट्टा एक साधं दिसणारं पण औषधी गुणांनी भरलेलं हिरवं पान.

पत्तरचट्टा ज्याला पानफूटी वनस्पती देखील म्हणतात. या वनस्पतीचा उपयोग सामान्य माणसाला फारसा ठाऊक नसतो. आयुर्वेदात मात्र याला विशेष महत्त्व आहे. हे पान पोटातील स्टोन्सच्या समस्यांवर प्रभावी उपाय मानलं जातं. विशेषतः मूत्राशयात किंवा मूत्रमार्गात तयार होणाऱ्या छोट्या-मोठ्या स्टोन्सवर ते चांगले परिणाम दाखवतं. नियमित आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास, हे पान दगड स्टोन्स विरघळवून शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतं.

जाणून घ्या उपाय-

हे पान वापरण्याची सोपी पद्धत म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी त्याची 2 ते 3 ताजी पाने चावून खाणं. काही लोक त्याचा रस काढून पिणं पसंत करतात, तो सुद्धा तेवढाच प्रभावी असतो. मात्र, हे करताना शरीरात पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवणं खूप गरजेचं आहे. पाणी स्टोन्स गाळून टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करतं आणि यकृतावरही ताण येत नाही.

हे मात्र लक्षात ठेवा की, कोणत्याही नैसर्गिक उपायांप्रमाणेच पत्तरचट्टाचाही प्रभाव लगेच दिसत नाही. स्टोन्सच्या आकारावर आणि तुमच्या शरीराच्या प्रकृतीवर याचा परिणाम किती काळात दिसेल, हे ठरतं. त्यामुळे संयम ठेवणं आणि नियमितपणे सेवन करणं गरजेचं आहे.

महत्वाचा सल्ला

तसेच, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा ज्यांना आधीच काही गंभीर वैद्यकीय समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे सेवन करू नये. कारण नैसर्गिक उपाय जरी फायदेशीर असले, तरी प्रत्येकासाठी योग्यच ठरतील असं नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!