चेहऱ्यावरील डाग, काळवटपणा दूर करण्यासाठी रोज लावा ‘हा’ नैसर्गिक फेसपॅक! घरच्या घरी फेसपॅक बनवण्याची पद्धत जाणून घ्या

Published on -

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी होणं, चेहऱ्यावर तेलकटपणा वाढणं किंवा अचानकच डाग दिसू लागणं हे सगळं तुमच्याही बाबतीत घडतंय का? मग तुमच्यासाठी एक घरगुती आणि अत्यंत सहज उपाय आहे, जो तुमचा चेहरा चमकदार आणि मऊ बनवेल.

आपण सगळेच आपल्याला तेजस्वी आणि निरोगी चेहरा असावा, अशी इच्छा बाळगतो. पण त्यासाठी महागडे फेसपॅक, ट्रीटमेंट्स, केमिकलयुक्त क्रीम्स वापराव्यात लागतात, असं समजलं जातं. मात्र हे खरं नाही. अगदी नैसर्गिक आणि सुरक्षित घटक वापरूनही तुम्ही चेहऱ्याची चमक परत मिळवू शकता. यासाठी कुठलाही खर्च, साइड इफेक्ट किंवा डॉक्टरांची गरज लागत नाही.

मध आणि दूध

कच्चं दूध हे केवळ पौष्टिक पेय नाही, तर सौंदर्याच्या दृष्टीनेही ते खूप प्रभावी आहे. त्यात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, जे त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. चेहऱ्यावरील मळ, धूळ हे दूध सहज दूर करतं आणि त्वचेला एक स्वच्छ, उजळ पोत देतं. त्यात आणखी जरा मध मिसळलात, की परिणाम चमत्कारी होतो.

मधमुळे त्वचेला पोषण मिळते, ओलावा टिकवून राहतो आणि डाग, पुरळ यांच्यावरही मध परिणामकारक ठरतो. त्यामुळे कच्चं दूध आणि शुद्ध मध यांचं मिश्रण हे एक परिपूर्ण फेसपॅक बनतं. यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक उजळपणा येतो, जो कुठल्याही फेशियलपेक्षा कमी नाही.

फेसपॅक ‘असा’ तयार करा-

हे मिश्रण तयार करणं अतिशय सोपं आहे. 2 चमचे कच्चं दूध आणि 1 चमचा मध एकत्र करून एकसंध करा. नंतर चेहरा नीट धुऊन, स्वच्छ हातांनी हे मिश्रण लावा आणि थोडा वेळ सौम्य मसाज करा. मसाज करताना तुम्हाला गारवा जाणवेल आणि या मिश्रणाचा सौम्य सुगंधही तुम्हाला प्रफुल्लित करेल. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

हे मिश्रण नियमितपणे लावल्यास, तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. चेहरा उजळ होईल, त्वचा अधिक मऊ होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही नैसर्गिक देखभाल तुम्हाला आत्मविश्वासाने भरून टाकेल. बाहेरच्या कृत्रिम उपायांपेक्षा तुमच्या घरातच असलेले हे दोन घटक सौंदर्यवर्धक ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!