स्वस्तात भारी स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंग आणि मोटोरोला या दोन प्रसिद्ध ब्रँडचे काही उत्तम स्मार्टफोन अवघ्या ₹9000 च्या खाली उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये केवळ मजबूत बॅटरीच नाही तर चांगला कॅमेरा, आकर्षक डिस्प्ले आणि स्लीक डिझाईनही मिळते. बजेट फोन असले तरी फीचर्सच्या बाबतीत हे फोन कोणत्याही महागड्या डिव्हाइसपेक्षा कमी नाहीत.

Samsung Galaxy M05
सॅमसंगने आपल्या ‘M’ आणि ‘A’ सिरीजमधून काही अशा मॉडेल्सची ऑफर दिली आहे, जे विशेषतः अशा ग्राहकांसाठी आहेत जे कमी बजेटमध्ये एक विश्वसनीय आणि टिकाऊ फोन शोधत आहेत. उदाहरणार्थ, Samsung Galaxy M05 हा फोन केवळ ₹6249 मध्ये उपलब्ध आहे. त्यात 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले, 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 5000mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते.
Samsung Galaxy A03
त्याचप्रमाणे, Samsung Galaxy A03 देखील एक चांगला पर्याय आहे. 3GB RAM आणि 32GB स्टोरेजसह येणारा हा फोन ₹7999 मध्ये उपलब्ध आहे. 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 48MP चा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीमुळे हा फोन दिवसभर सहज टिकतो. सॅमसंगचा आणखी एक पर्याय म्हणजे Galaxy M06, जो 5G कनेक्टिव्हिटीसह येतो आणि डिमेन्सिटी 6300 प्रोसेसरवर चालतो. त्याची किंमत ₹7999 आहे.
Motorola E13
मोटोरोला प्रेमींसाठीही चांगले पर्याय आहेत. Motorola E13 हा फोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह ₹6999 मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 13MP कॅमेरा असून 5000mAh बॅटरीचा समावेश आहे. जर तुम्हाला थोडं जास्त बॅटरी बॅकअप आणि डॉल्बी साउंडसिस्टम हवी असेल, तर Motorola E7 Power आणि Moto G05 तुमच्यासाठी योग्य आहेत. E7 Power मध्ये 5200mAh बॅटरी, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेरा मिळतो, तो ₹8999 मध्ये आहे. दुसरीकडे, G05 फक्त ₹7098 मध्ये 5200mAh बॅटरीसह डॉल्बी साऊंड सपोर्टसह उपलब्ध आहे