डायलिसिस, कर्करोग तसेच ‘या’ मोठ्या आजारांवर होईल मोफत उपचार! सरकारी योजनेसाठी आजच नोंदणी करा, पाहा संपूर्ण प्रोसेस

Published on -

वृद्धांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला वैद्यकीय खर्चाच्या भीतीने काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने एक अशी योजना सुरू केली आहे जी तुमच्या वृद्धापकाळातील आरोग्याची जबाबदारी उचलते, तीही पूर्णतः मोफत. ‘आयुष्मान वय वंदना योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून 70 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार दिले जातात. विशेष म्हणजे, ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणताही विमा प्रीमियम भरावा लागत नाही.

 

ही योजना 29 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आणि ती आता लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. तुमचे उत्पन्न किती आहे, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, किंवा कुठल्या धर्माचे आहातया गोष्टींना काहीही महत्त्व नाही. या योजनेचा एकमेव निकष म्हणजे तुमचे वय 70 पेक्षा अधिक असणे.

‘आयुष्मान वय वंदना कार्ड’

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’. हे कार्ड मिळवले की तुम्ही देशभरातील 30,000 पेक्षा अधिक खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकता. कार्ड मिळवण्यासाठी लागणारी एकमेव कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. ही नोंदणी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करता येते, आणि त्यासाठी फारसा वेळही लागत नाही.

या योजनेत मिळणाऱ्या सुविधांमध्ये कर्करोग, हृदयरोग, हाडांचे आजार, डायलिसिस, आयसीयू उपचार यांचा समावेश आहे. इतर आरोग्य विम्यांप्रमाणे या योजनेत प्रतीक्षा कालावधी नाही. म्हणजेच, तुम्हाला कार्ड मिळताच पहिल्याच दिवसापासून मोफत उपचार सुरू करता येतात.

नोंदणी कशी कराल?

नोंदणीसाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून ‘आयुष्मान अॅप’ डाउनलोड करू शकता किंवा beneficiary.nha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ‘Beneficiary/Operator’ म्हणून लॉगिन करावे लागेल. तुमचा मोबाइल नंबर, आधार तपशील, नाव आणि पत्ता यांसारखी माहिती भरल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरून फॉर्म सबमिट करता येतो. मंजुरी मिळताच तुम्ही तुमचं कार्ड लगेच डाउनलोड करू शकता.

उपचारासाठी कोणती रुग्णालये उपलब्ध आहेत हे पाहण्यासाठी hospitals.pmjay.gov.in या वेबसाइटवर राज्य, जिल्हा किंवा पिनकोड टाकून शोध घेता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!