आपण घरी मोबाईल चार्ज केल्यानंतर अनेकदा फक्त मोबाईलच काढतो आणि चार्जर तसाच प्लगमध्ये ठेवतो, हे खरे ना? बहुतेकजण असंच करतात. पण हीच छोटीशी सवय, रोजच्या रोज नकळत वीज वापरत असते आणि त्याचा परिणाम तुमच्या वीजबिलावर होतो, हे ऐकून तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटेल. चला तर मग, यामागचं खरं कारण समजून घेऊया.

आजचं जग स्मार्टफोनवर अवलंबून आहे. घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात फोन सतत सोबत असतो आणि त्याला वेळोवेळी चार्ज करावं लागतं. चार्जिंग झाल्यावर आपण मोबाईल काढतो, पण चार्जर तसाच प्लगला लावलेला राहतो. बऱ्याच लोकांना वाटतं की फोन नसताना चार्जर वीज वापरत नाही, पण हे अर्धसत्य आहे.
“स्टँडबाय पॉवर”
तांत्रिकदृष्ट्या बघितल्यास, प्लगमध्ये लावलेला कोणताही इलेक्ट्रॉनिक उपकरण, जरी ते वापरात नसलं तरी, थोड्याफार प्रमाणात वीज घेत असतो. यालाच “स्टँडबाय पॉवर” किंवा “व्हॅम्पायर एनर्जी” म्हणतात. मोबाइल चार्जरही याला अपवाद नाही. चार्जरमध्ये फोन नसतानाही, तो वीज वापरतो. जरी प्रमाण फारच कमी असलं तरीही. काही संशोधनांनुसार, एक सरासरी चार्जर दर तासाला 5 वॅट वीज वापरतो.
हे प्रमाण ऐकायला लहान वाटत असलं, तरी विचार करा, घरात जर 3-4 चार्जर सतत प्लगमध्ये लावलेले असतील आणि ते 24 तास तसंच राहिले, तर महिन्याच्या शेवटी तुमच्या वीजबिलात त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः त्या घरांमध्ये जिथे अनेकजण एकाच वेळी आपले मोबाईल चार्ज करतात, ही निष्काळजी सवय महागात पडू शकते.
वीज बिल होईल कमी-
आपण नेहमी वीजबचतीच्या गोष्टी ऐकत असतो. सरकार मोहिमा राबवतं, जाहिराती दाखवतात. पण त्या वीजबचतीची सुरुवात आपल्याच घरापासून, अशा छोट्या कृतींमधून व्हावी लागते. जसं आपण पंखा, टीव्ही किंवा लाईट वापरून झाल्यावर बंद करतो, तसंच चार्जरही मोबाईल काढल्यानंतर प्लगमधून काढणं आवश्यक आहे. यामुळे तुमचे लाइट बिल तर कमी होईलच शिवाय तुम्ही एकप्रकारे वीज देखील बचत कराल.