कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज खा शेंगदाणे, वजनही राहील नियंत्रणात!

Published on -

‘शेंगदाणे’ आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडणारा आणि बहुतेक वेळा दुर्लक्षित राहणारा एक असा ड्रायफ्रूट आहे, जो हृदयासाठी अक्षरशः संजीवनी ठरू शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला कोलेस्टेरॉल आणि त्यातून होणाऱ्या हृदयविकारांचा धोका पाहता, लोक भरमसाठ पैसे खर्च करून विविध अन्नघटक शोधतात. पण, बऱ्याचदा आपल्या घरातच असलेले काही उपाय दुर्लक्षित राहतात आणि शेंगदाणे हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे.

आजकाल अनेकांना उच्च कोलेस्टेरॉलची तक्रार असते. सतत ताण, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि त्यातून हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. पण नुसता औषधांवर भर न देता, आहारात काही बदल केले तर परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. शेंगदाणे हे त्यासाठी एक अत्यंत किफायतशीर आणि प्रभावी पर्याय आहे.

शेंगदाण्यांमधील घटक

शेंगदाण्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि चांगल्या प्रकारची चरबी असते, जी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर, शेंगदाण्यात रेस्वेराट्रोल नावाचे एक विशेष अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांमध्ये साचणाऱ्या चरबीवर नियंत्रण ठेवते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेला बळकटी देते. हे अँटीऑक्सिडंट हृदयाला हानीपासून वाचवण्याचे काम करते.

वजन नियंत्रणसाठी उपयुक्त

पण शेंगदाण्याचे फायदे केवळ हृदयापुरते मर्यादित नाहीत. हे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. त्यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि अन्नाचा उशिरा पचाव लागतो, त्यामुळे भूक लवकर लागत नाही. यामुळे आपण नकळतच जास्त खाणं टाळतो. याशिवाय, शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे.

शेंगदाणे कधी आणि कसे खावे?

शेंगदाणे तुम्ही विविध पद्धतीने आहारात समाविष्ट करू शकता. सकाळच्या न्याहारीत मूठभर भाजलेले शेंगदाणे घ्या, किंवा सॅलडमध्ये थोडे टाका. पीनट बटरही एक उत्तम पर्याय आहे, पण त्यात साखर किंवा मीठ कमी प्रमाणात असलेलं बघा. जास्तीत जास्त फायदे हवे असतील तर कच्चे किंवा फक्त हलके भाजलेले शेंगदाणे खाणे अधिक उपयुक्त ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!