मोठी कमाई करूनही हातात पैसे टिकत नाहीत?, ‘या’ फेंगशुई उपायामुळे बदलेल नशीब! तिजोरी कायम राहील पैशांनी भरलेली

Published on -

कधी कधी आपण कितीही कष्टाने पैसे कमावले, तरी ते हातात राहत नाहीत. महिन्याच्या सुरुवातीलाच पगार येतो आणि आठवड्याभरात खर्चाच्या गराड्यात सगळं संपून जातं. अशावेळी प्रश्न पडतो, की दोष आपल्यात आहे की आपल्या घरात? फेंगशुई या प्राचीन चिनी वास्तुशास्त्रात असाच एक उपाय सांगितला आहे, जो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून पैशाचा अपव्यय थांबवण्याची शक्यता निर्माण करतो.

फेंगशुईनुसार, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहणं ही संपत्ती साचण्याची पहिली पायरी असते. पण जर घराच्या मुख्य दरवाजावर गोंधळ असेल, किंवा पाण्याचा प्रवाह अयोग्य असेल, तर हे ‘धन क्षेत्र’ दूषित होतं. अशा स्थितीत, कमावलेले पैसे घरात थांबत नाहीत. मास्टर झुआंग नावाचे एक सुप्रसिद्ध फेंगशुई तज्ज्ञ सांगतात की, यावर एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय आहे, तांदळाचा.

 

फेंगशुई यांचा उपाय

तुमच्या घरातले नकारात्मक वायू कमी करून पैसे ओढून घेण्यासाठी, मूठभर कच्चे तांदूळ घ्या. या तांदळाला लाल कापडात गुंडाळा किंवा लाल रंगाच्या पिशवीत ठेवा. लाल रंग समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक मानला जातो. या तांदळाचा गठ्ठा तयार झाल्यावर, तो घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात लटकवा. फेंगशुईत ही जागा ‘धन क्षेत्र’ म्हणून ओळखली जाते.

हा उपाय सात दिवस अवलंबा. सातव्या दिवशी हा तांदळाचा गठ्ठा काढून टाका. तो घरात ठेवू नका आणि खाऊही नका. त्याऐवजी, तो घराबाहेर कुठल्यातरी झाडाखाली किंवा दूर फेकून द्या. असा विश्वास आहे की हा तांदूळ घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा स्वतःत घेतो आणि त्यामुळे घरातील आर्थिक प्रवाह पूर्ववत होतो.

चिनी संस्कृतीतील तांदळाचे महत्व

चिनी संस्कृतीत तांदळाला केवळ अन्न नव्हे तर सौख्य आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच, अशा घरगुती उपायांमध्ये तांदळाचा वापर विशेष केला जातो. आणि जरी ही पद्धत पारंपरिक असली, तरी मानसिक समाधान आणि एक सकारात्मक सुरुवात म्हणून याचा अवलंब करणे नक्कीच उपयोगी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!