EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपासून ATM मधून काढता येतील PF चे पैसे, जाणून घ्या लिमिट

Published on -

तुम्ही जर पीएफ काढण्यासाठी वेळखाऊ प्रक्रिया, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि ऑफिसच्या फेऱ्यांमुळे वैतागला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डमधून थेट पीएफचे पैसे काढू शकाल. होय, अगदी बँकेत जावे न लागता, घराजवळच्या एटीएमवरून ही सुविधा वापरता येईल. यामुळे पीएफ व्यवहार अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक बनणार आहे.

जुलै अखेरीस सुरू होणार सेवा

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी नुकतीच माहिती दिली की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता बँक खात्यांप्रमाणे पीएफ खात्यांनाही डिजिटल व्यवहारासाठी सक्षम करत आहे. याचाच एक भाग म्हणून, EPFO जुलै महिन्याच्या अखेरीस ही डेबिट कार्ड आधारित सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ज्या खातेदारांची KYC माहिती अपडेट आहे आणि UAN सक्रिय आहे, त्यांना सर्वप्रथम ही सुविधा उपलब्ध होईल.

या सुविधेचा मुख्य उद्देश म्हणजे पीएफवरील तातडीच्या गरजांसाठी सहजपणे आणि लवकर पैसे उपलब्ध करून देणे. आधी जिथे ऑनलाइन व्यवहारासाठी 7 ते 10 दिवस लागत असत, तिथे आता 72 तासांतच पैसे खात्यात जमा होणार आहेत. नवीन प्रणालीत ऑटो सेटलमेंटची सोय असून, वैध आधार, पॅन आणि KYC असलेल्या खात्यांमध्ये कोणतेही मानवी हस्तक्षेप न करता व्यवहार पूर्ण होतील.

किती रक्कम काढता येईल?

एटीएममधून किती रक्कम काढता येईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी अंदाजानुसार ही मर्यादा ₹25,000 ते ₹1,00,000 दरम्यान असू शकते. कारण सध्या बहुतेक बँका त्यांच्या एटीएमद्वारे एका व्यवहारात ₹20,000 ते ₹50,000 काढण्याची मुभा देतात, तर काही प्रीमियम कार्डांवर ही मर्यादा ₹1,00,000 पर्यंतही असते.

आपत्कालीन परिस्थिती, जसे की वैद्यकीय उपचार, विवाह किंवा घर खरेदीसाठी EPFO आधीपासूनच अंशतः पैसे काढण्याची परवानगी देत आहे. पण आता ही प्रक्रिया आणखी सोपी, जलद आणि कागदपत्रविरहित होणार आहे. विशेष म्हणजे, ₹1 लाखांवर असलेली आपत्कालीन काढण्याची मर्यादा आता थेट ₹5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ही गरजूंना दिलासा देणारी मोठी सुधारणा ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!