2025 मधील जगातील सर्वात शांत देशांची यादी समोर ! या क्रमवारीत भारत अन पाकिस्तान कुठे आहेत ?

भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव, इराक आणि इराण यांच्यातील युद्ध, शिवाय युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल पीस इंडेक्स जाहीर करण्यात आला आहे. ग्लोबल पीस इंडेक्स अंतर्गत जगातील सर्वाधिक शांत देशांची यादी जाहीर करण्यात येते.

Published on -

Most Peaceful Countries 2025 : 2025 हे वर्ष संघर्षाचे वर्ष आहे अस आपण म्हणू शकतो. कारण आता तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याचे कारणही तसेच आहे. युरोपात रशिया आणि युक्रेन या दोन उभय देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच तिकडे इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक घातक वळण प्राप्त झाले आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातही नुकत्याच काही दिवसांपूर्वी संघर्ष पाहायला मिळाला होता. दोन्ही देशांकडून हल्ले – प्रति हल्ले करण्यात आलेत.

अशा या परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त करणे स्वाभाविक आहे. म्हणून या संघर्षाच्या वर्षात ग्लोबल पीस इंडेक्सकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुकताच जाहीर करण्यात आला आहे. खरे तर ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजेच जीपीआय हा एक वार्षिक अहवाल आहे जो की जगातील विविध देशांमधील शांततेची स्थिती मोजत असतो.

म्हणजेच यातून जगातील सर्वाधिक शांत देश कोणते आणि अशांत देश कोणते? याचे आकलन केले जाते. दरम्यान सालाबादप्रमाणे याहीवर्षी जीपीआय जाहीर करण्यात आला आहे आणि यामध्ये जगभरातील देशांना त्यांच्या शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेच्या आधारावर क्रमवारी देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या क्रमवारीच्या आधारावर जगातील टॉप 10 शांत देश कोणते आहेत आणि आपला भारताचा या यादीत कितवा नंबर लागतो याचीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

जगातील टॉप 10 शांत देश कोणते आहेत

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

आइसलँड : गेल्या वर्षी म्हणजे 2024 च्या जीपीआय इंडेक्स मध्ये हा देश पहिल्या क्रमांकावर होता आणि यंदाही हा देश या क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. शांततापूर्ण समाज, कमी गुन्हेगारी दर आणि उच्च दर्जाच्या जीवन ही या देशाची वैशिष्ट्ये आहेत. 

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

आयर्लंड : मिळालेल्या माहितीनुसार या यादीत आयर्लंड हा देश गेल्या वर्षी सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर होता आणि यंदाही दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्थिर राजकीय वातावरण, कमी हिंसाचार आणि कमी गुन्हेगारी दर यासाठी हा देश विशेष ओळखला जात आहे. 

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

न्यूझीलंड : शांत देशांच्या यादीत न्यूझीलंड गेल्या वर्षी चौथ्या स्थानावर होता मात्र यंदा हा देश तिसऱ्या क्रमांकावर आलाय. नैसर्गिक सौंदर्य, सुरक्षित वातावरण, सामाजिक स्थिरता आणि शांततेसाठीही हा देश संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

ऑस्ट्रिया : ऑस्ट्रिया हा युरोपातील एक महत्त्वाचा देश आहे. गेल्या वर्षी हा देश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता मात्र यंदा तो चौथ्या क्रमांकावर आलाय. येथील समाजही बराच शांत आहे. येथील लोक कायद्याचा आदर करतात आणि समाजात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

स्वित्झर्लंड : गेल्यावर्षी जीपीआय इंडेक्स मध्ये हा देश सहाव्या क्रमांकावर होता. पण ही युरोपियन कंट्री 2025 च्या यादीत एक क्रमांक वर सरकली आहे. यंदाच्या जी पी आय इंडेक्स मध्ये हा देश पाचव्या क्रमांकावर आलाय. स्वित्झर्लंड हा देश केवळ तटस्थतेसाठी ओळखला जात नाही, तर सामाजिक स्थिरता आणि शांततेसाठीही हा देश संपूर्ण जगात ख्यातनाम आहे.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

सिंगापूर : गेल्या वर्षी हा देश पाचव्या क्रमांकावर होता मात्र यंदा म्हणजे 2025 च्या यादीत हा देश सहाव्या क्रमांकावर आलाय. हा आशियातील सर्वाधिक श्रीमंत देश आणि येथील कडक कायदेशीर व्यवस्था आणि प्रगत सुरक्षा व्यवस्था यामुळे हा जगातील सर्वाधिक शांत देशांच्या यादीत येतो.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

पोर्तुगाल : पोर्तुगाल गेल्या वर्षी या यादीत सातव्या क्रमांकावर होता आणि यंदा पण तो सातव्या क्रमांकावरच आहे. अलिकडच्या काही वर्षांत शांतता आणि स्थिरतेच्या बाबतीत या देशाने लक्षणीय सुधारणा केली आहे म्हणून हा देश जगातील सर्वाधिक शांत देशांच्या यादीत येतो.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

डॅनमार्क : 2024 प्रमाणे 2025 मध्ये देखील डेन्मार्क हा देश या यादीत आठव्या क्रमांकावर आलाय. सामाजिक स्थैर्य आणि उच्च दर्जाच्या जीवनशैलीमुळे हा देश जगातील सर्वाधिक शांत टॉप 10 देशांमध्ये येतो.

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

स्लोव्हेनिया : 2024 प्रमाणे 2025 मध्ये देखील स्लोव्हेनिया हा स्थिरता आणि शांततापूर्ण समाजामुळे जागतिक शांतता निर्देशांकात नवव्या क्रमांकावर आला आहे. 

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

फिनलँड : गेल्या वर्षी जीपीआय इंडेक्स मध्ये मलेशिया हा देश दहाव्या क्रमांकावर होता मात्र यावर्षी अर्थात 2025 च्या जीपीआय इंडेक्स मध्ये फिनलँड हा देश दहाव्या क्रमांकावर आलाय. ही युरोपियन कंट्री शांततापूर्ण समाजामुळे या यादीत चांगली प्रगती करताना दिसत आहे.

भारताचा नंबर कितवा?

Most Peaceful Countries 2025
Most Peaceful Countries 2025

वर्ष 2024 मध्ये जीपीआय इंडेक्समध्ये भारताचा नंबर 116 होता. पण यंदा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव अंतर्गत संघर्ष, सामाजिक अस्थिरता आणि सीमा विवाद यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत असतानाही भारताला जगातील सर्वाधिक शांत देशांमध्ये 115 वा क्रमांक मिळालाय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत या यादीत 2024 मध्ये 116, 2023 मध्ये 126, 2020 मध्ये 139 आणि 2019 मध्ये 141 क्रमांकावर राहिला आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांमधील परिस्थिती पाहिली असता यंदाची GPI इंडेक्स मधील आकडेवारी देशासाठी समाधानकारक आहे. तथापि, जागतिक शांतता निर्देशांकात चांगले स्थान मिळविण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!