दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणे म्हणजे फक्त थकवा नाही, तर शरीरात जडपणा, कंबरदुखी, मानेचे त्रास आणि वजनवाढसारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो. पण जर तुम्हाला जिमला जाण्यास वेळ मिळत नसेल, तरीही निराश होण्याचे कारण नाही. कारण अशी खास योगासनं आहेत, जी तुम्ही खुर्चीवर बसून अगदी सहज करू शकता.

मान रक्ताभिसरण आसन
ऑफिसमध्येच मानेचे काही मिनिटांचे सर्कुलर मूव्हमेंट केल्यास तुमच्या मानेतील कडकपणा दूर होतो. डावीकडून उजवीकडे, मग उजवीकडून डावीकडे असं हळूच घ्या श्वास घेत हे चक्र पूर्ण करा. फक्त 5 वेळा दोन्ही बाजूंनी केल्याने फरक जाणवेल.
मार्जरी आसन (Cat-Cow Pose)
खुर्चीवर बसून या आसनासाठी दोन्ही पाय जमिनीवर आणि हात गुडघ्यांवर ठेवा. श्वास घेताना छाती बाहेर काढा आणि मान वर उचला, श्वास सोडताना पाठीचा कणा वाकवा आणि मान खाली करा. 5 वेळा असं केल्यास तणाव दूर होईल.
अर्ध मत्स्येंद्रासन
पाठीचा कणा सरळ ठेवून खुर्चीवर बसा. श्वास घेऊन उजव्या बाजूला हळूच वळा आणि डाव्या हाताने उजव्या गुडघ्यावर हात ठेवा. काही सेकंद त्याच स्थितीतराहा, नंतर दुसऱ्या बाजूने सेम कृती करा. यामुळे पचन सुधारते आणि कंबरेचा ताणही कमी होतो.
उर्ध्व हस्तासन (Upward Salute)
दोन्ही हात वर उचलून श्वास घ्या आणि छाती उंच करा. काही वेळ याच स्थितीत राहा आणि श्वास सोडून हात खाली आणा. 10 ते 15 वेळा ही कृती केल्यास खांद्याचे दुखणे आणि थकवा दूर होतो.
गरुडासन
खुर्चीवर बसून उजव्या पायाला डाव्या पायावर ओढा आणि डाव्या हाताने उजवा हात गुंडाळा. दोन्ही कोपर वर करा आणि 5 श्वास घेऊन याच स्थितीत रहा. दुसऱ्या बाजूनेही हीच कृती करा. यामुळे शरीरात लवचिकता वाढते आणि सांधेदुखी कमी होते.