फक्त 10 मिनिटांत गंजलेली कढई आणि तवा नव्यासारखा चमकेल, वापरुन पाहा ‘ही’ भन्नाट क्लीनिंग ट्रिक!

Published on -

भारतीय स्वयंपाकघरात लोखंडी कढई हा एक अत्यावश्यक भाग असतो. यात शिजवलेला पोहा, भाजी किंवा आमटी अगदी खास चव घेऊन येते. मात्र, हीच कढई जर गंजली, तर तिचा उपयोग करणे वैताग बनतो. स्वच्छ करताना हात दुखतात, वेळ जातो आणि तरीही तवा किंवा कढई स्वच्छ होत नाही. अशावेळी स्वस्त आणि घरच्या घरी करता येणारे काही उपाय आहेत, जे गंज हटवण्यात खूप प्रभावी ठरू शकतात.

लोखंडी कढईत शिजवलेल्या अन्नामुळे शरीराला उपयुक्त असलेले लोहही मिळते, त्यामुळे ही भांडी आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जातात. पण या फायद्यासोबत एक त्रास नेहमीच जोडलेला असतो, टो म्हणजे गंज. जर वेळेवर काळजी घेतली नाही, तर लोखंडी कढईला गंज लागतो आणि त्यात अन्न बनवणं धोक्याचं ठरू शकतं.

लिंबू आणि मीठ

या गंजचा उपाय अगदी आपल्या स्वयंपाकघरातच आहे, तो म्हणजे लिंबू आणि मीठ. एका लिंबाला मधोमध कापून त्यावर थोडं मीठ शिंपडा आणि गंजलेल्या भागावर चोळा. काही वेळाने त्यावर स्क्रबर फिरवा आणि पाण्याने धुवा. गंज सहज निघतो आणि तवा परत एकदा चमकू लागतो.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

दुसरा एक उपाय म्हणजे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा. थोडं व्हिनेगर एका बाउलमध्ये घेऊन त्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण ब्रश किंवा कापडाच्या मदतीने गंजलेल्या भागावर लावा. 10-15 मिनिटं तसेच राहू द्या. नंतर स्क्रबरने स्वच्छ केल्यावर तवा आरशासारखा चमकेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कढई वापरल्यानंतर ती स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवणं आवश्यक आहे. जर ती ओलसर राहिली, तर परत गंज लागण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे वाफ टाकून, टॉवेलने पुसून किंवा कोरड्या उन्हात ठेवून तवा नीट वाळवणं ही एक सोपी पण महत्त्वाची सवय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!