तब्बल 25 कोटी तिकीटांची विक्री, 1975 मध्ये आलेल्या ‘या’ भारतीय चित्रपटाचा रेकॉर्ड आजही कायम!

Updated on -

भारतीय सिनेमा हा फक्त मनोरंजन नसून, तो देशाच्या संस्कृतीचा आरसा आहे. दरवर्षी बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करणारे सुपरहिट चित्रपट येतात, कोटींची कमाई करतात, पण काही चित्रपट असे असतात जे फक्त रेकॉर्ड्ससाठी नव्हे, तर जनतेच्या मनात कायमचं घर करत जातात.

असाच एक चित्रपट म्हणजे ‘शोले’ज्याने गेल्या 50 वर्षांपासून एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, की आतापर्यंत कोणताही आधुनिक ब्लॉकबस्टर चित्रपट तो मोडू शकलेला नाही.

1975 मधील शोलेची क्रेझ

1975 मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा केवळ एक चित्रपट नव्हता, ती एक भावना होती. जिथे कथा, अभिनय, संवाद, संगीत आणि पात्रं यांनी भारतीय प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. त्याकाळात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार आणि अमजद खान यांची स्टारकास्ट म्हणजे स्वप्नवत होतं. पण गंमत म्हणजे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीस त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनीही फारसं कौतुक केलं नव्हतं आणि ‘शोले’ एक अपयशी प्रयोग ठरेल, अशीच चर्चा होती.

मात्र, हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद बदलू लागला. जय-वीरूची दोस्ती, बसंतीचा थेटपणा, गब्बरचं भय आणि ठाकूर साहेबांची व्यथा हे सगळं प्रेक्षकांच्या मनात खोलवर बसलं. लोक परत परत थिएटरमध्ये गेले. परिणामी, ‘शोले’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर या चित्रपटाची क्रेझ निर्माण झाली. ‘शोले’ तब्बल 6 वर्षे चित्रपटगृहात लागलेला होता आणि एकट्या भारतात 15 कोटी तिकिटे विकली गेली होती.

त्यानंतर चित्रपटाचे विविध वेळा पुनःप्रदर्शन झाल्यानंतर अजून 3 कोटी तिकिटांची विक्री झाली. युरोप, अमेरिका, मध्य पूर्व अशा जागतिक पातळीवर देखील ‘शोले’ने आपली छाप सोडली आणि एकूण 25 कोटी तिकिटांची ऐतिहासिक विक्री झाली. ही संख्या आजही तोडली गेलेली नाही.

शोलेचा रेकॉर्ड अजूनही कायम

पुष्पा 2, बाहुबली २2, केजीएफ चॅप्टर 2 आणि RRR सारख्या आजच्या यशस्वी चित्रपटांनी हजारो कोटींची कमाई केली, ग्लोबल मार्केट गाजवले, पण ‘शोले’सारखी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करण्यात कोणीही यशस्वी ठरलेलं नाही. कारण ‘शोले’ने केवळ कमाई केली नाही, तर त्याने एक अखंड आठवण तयार केली जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते.

आज 50 वर्षांनंतरही ‘शोले’चं नाव घेतलं की प्रत्येक पिढीच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं आणि कदाचित हेच आहे त्या चित्रपटाचं खरं यश, जो काळाच्या कसोटीत उतरूनही लोकांच्या मनात अजरामर राहिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!