महागड्या अँटी-एजिंग क्रीम्स सोडा, फक्त 5 आयुर्वेदिक सवयींने वर्षानुवर्षे दिसाल तरुण आणि टवटवीत!

Published on -

आजकाल अनेकजण कमी वयातच थकलेले, फिकट चेहऱ्याचे आणि झिजलेले दिसतात. त्यामागे तणाव, चुकीचा आहार, झोपेचा अभाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही मुख्य कारणं असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण वृद्धत्वाला थोपवू शकत नाही. आयुर्वेद आपल्याला काही अशा सहज, नैसर्गिक सवयी सुचवतो, ज्यामुळे वयाच्या गतीला हळू करता येते आणि आपण वर्षानुवर्षं तरुण व उत्साही राहू शकतो.

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वय वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला थांबवता येत नाही, पण योग्य दिनचर्येने तिचा वेग नक्कीच कमी करता येतो. त्यांनी सुचवलेल्या काही सवयी जर आपण आपल्यात रूजवल्या, तर केवळ चेहरा नाही तर शरीर आणि मनही दीर्घकाळ तरुण राहू शकते.

दररोज एक चमचा तूप खा

त्यापैकी सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे दररोज एका चमच्याने तुपाचे सेवन. सध्या बरेच लोक तूप टाळतात, पण आयुर्वेदानुसार तूप हे शरीरातील कोरडेपणा कमी करते, पचनशक्ती सुधारते आणि त्वचेला आतून पोषण देऊन तिचे वृद्धत्वाचे लक्षणं दूर ठेवते. विशेषतः संथ चयापचयामुळे चेहरा कोरडा आणि सुरकुतलेला दिसू लागतो. तूप हे यासाठी एक रामबाण उपाय आहे.

चालण्याची सवय

याशिवाय चालण्याची सवय ही देखील आयुष्यभर तरुण राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. दररोज सुमारे 7,000 ते 10,000 पावले चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, वजन नियंत्रित राहते आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारते. हलका पण नियमित व्यायाम हे वृद्धत्व टाळण्यासाठी औषधासारखे काम करते.

सूर्यास्तपूर्वी जेवण

तिसरी महत्वाची सवय म्हणजे सूर्यास्त होण्याआधी रात्रीचे जेवण करणे. जेवण वेळेवर आणि हलके घेतल्यास शरीराला झोपेसाठी पुरेशी विश्रांती मिळते, पचन योग्य होतं आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे सगळं वृद्धत्वाचे लक्षणं टाळण्यात मदत करतं.

चांगली झोप

यासोबत, चांगली झोप म्हणजेच सातत्यानं आणि पुरेशी झोप घेणे देखील खूप आवश्यक आहे. रात्रीची झोप अपूर्ण असल्यास चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, आणि त्वचेवर सुरकुत्या लवकर दिसू लागतात. म्हणून दिवसातील किमान 6 ते 7 तासांची गाढ झोप ही शरीराच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक आहे.

आहार

शेवटी, आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे, आणि ऋतूनुसार व्यायाम करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात थोडा हलका व्यायाम, तर थंडीत उष्णता देणाऱ्या क्रिया शरीराला योग्य ठरतात. ऋतुनुसार शरीराला साथ दिल्यास त्याची झीज कमी होते आणि आपण अधिक काळ सशक्त व उत्साही राहतो.

म्हणजेच सौंदर्यप्रसाधनं, मेकअप किंवा महागडे उपचार यांच्यापेक्षा जीवनशैलीतील साध्या पण परिणामकारक सवयी आपल्याला खऱ्या अर्थाने ‘तरुण’ ठेवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!