जगातील सर्वात कर्जबाजारी देशांची यादी समोर, भारताचा मित्र देश पहिल्या नंबरवर!

Published on -

जगातील अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पाहिला तर आपण सहज म्हणतोअमेरिका, युरोप, ब्रिटन हे देश श्रीमंत आहेत, प्रगत आहेत, आणि त्यांच्या जवळ अपार संपत्ती आहे. पण ही केवळ एक बाजू आहे. वास्तव पाहिलं, तर आर्थिकदृष्ट्या भक्कम वाटणारे हेच देश कर्जाच्या विळख्यात खोलवर अडकले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पाकिस्तानसारख्या देशाची दुर्दशा चर्चेत असतानाही, तो या टॉप 10 कर्जबाज देशांच्या यादीत नाहीच. या यादीत भारताचा ‘घनिष्ठ मित्र’ पहिल्या क्रमांकावर आहे.

आज जगातील अनेक देश स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत आहेत. हे कर्ज केवळ देशांतर्गत खर्चासाठी नाही, तर संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, आणि कल्याणकारी योजनांसाठीही घेतले जाते. मात्र, या कर्जाचा बोजा इतका वाढला आहे की अनेक प्रगत राष्ट्रेही त्याखाली दबली गेली आहेत. यामुळे त्यांच्या देशांत आर्थिक असंतुलन, महागाई, आणि बेरोजगारीसारख्या समस्या वाढू लागल्या आहेत.

अमेरिका

या यादीत पहिलं नाव आहे अमेरिकेचं, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था. पण त्याचवेळी तिचं कर्जही सर्वाधिक आहे. तब्बल 26 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज अमेरिका वाहत आहे. सरकारी खर्च, सैन्य व्यवस्थापन, आणि गुंतवणूक यामुळे हे कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. या कर्जाचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवतो.

युरोपियन युनियन

दुसऱ्या क्रमांकावर आहे युरोपियन युनियन. म्हणजेच युरोपातील अनेक देशांची आर्थिक युती. त्यांच्या एकत्रित कर्जाची रक्कम 18 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ वाटणारा हा संघ देखील कर्जाच्या संकटात सापडला आहे.

ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी

ब्रिटन, ज्याने ब्रेक्झिटनंतर आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली, तो आता 10 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जाखाली आहे. फ्रान्स आणि जर्मनीसारखे युरोपातील महत्त्वाचे देशही अनुक्रमे 8 आणि 7 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जात आहेत. त्यांची सामाजिक कल्याणकारी धोरणं आणि मोठे सरकारी खर्च याला कारणीभूत ठरले आहेत.

जपान

जपानसारखा तंत्रज्ञानात अग्रेसर देश 4.5 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जासह सहाव्या क्रमांकावर आहे. इथली लोकसंख्या वृद्ध होत चालल्यामुळे आरोग्य आणि निवृत्तीवेतनासाठी होणारा खर्चही कर्ज वाढवतो आहे.

नेदरलँड्स

लहान पण श्रीमंत देश म्हणून ओळखला जाणारा नेदरलँड्स 4.4 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जाखाली आहे. लक्झेंबर्ग, ज्याचं दरडोई उत्पन्न जगात सर्वोच्च आहे, त्याच्यावरही 4 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. तंत्रज्ञान उद्योगाचा हब बनलेला आयर्लंड 3.3 ट्रिलियन डॉलर्स आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध कॅनडा 3.12 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!