अंकशास्त्र हा एक असा विषय आहे, ज्यामध्ये केवळ जन्मतारीख पाहूनही एखाद्याच्या स्वभावाचे, विचारसरणीचे, अगदी नातेसंबंधांतील भूमिका जाणून घेता येते. विशेषतः मुलींच्या बाबतीत, त्यांच्या अंकानुसार त्या नातेसंबंधात कशा प्रकारे वागत असतात, हे लक्षात घेतल्यास त्यांच्या आयुष्यातील अनेक बाबी अधिक स्पष्ट होतात. काही मुली अशा असतात की ज्या नात्यात आपले वर्चस्व राखतात, तर काही आपल्या सहज, सौम्य स्वभावाने ते नाते सांभाळतात. आज आपण अशाच काही विशिष्ट अंक असलेल्या मुलींच्या स्वभावाचा मागोवा घेणार आहोत.
मूलांक 1

जर एखाद्या मुलीचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल, तर तिचा मूलांक 1 असा मानला जातो. या मुली अत्यंत आत्मविश्वासाने भरलेल्या असतात. त्या नेतृत्वगुणांनी समृद्ध असतात आणि नातेसंबंधात त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यांना आपल्या जोडीदारावर प्रभाव टाकायला आवडतं आणि त्यांचं बोलणं, निर्णय हे अनेकदा अंतिम मानलं जातं. त्यांचा आत्मविश्वास इतका प्रभावी असतो की जोडीदार नकळत त्यांचा आदर करत त्यांचे विचार स्वीकारतो.
मूलांक 3
मूलांक 3 असलेल्या मुलींचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. त्या अत्यंत बुद्धिमान आणि संवादकौशल्यात पारंगत असतात. त्या त्यांची मते अत्यंत संयमानं, परंतु ठामपणे मांडतात आणि अनेकदा आपल्या विचाराने जोडीदाराचा दृष्टिकोनही बदलवतात. त्या नात्याचं सूत्र स्वतःच्या हाती ठेवतात, पण यासाठी त्यांना वाद घालावा लागत नाही, तर केवळ त्यांची तार्किक विचारशक्तीच पुरेशी असते.
मूलांक 5
मूलांक 5 असलेल्या मुली अत्यंत सामाजिक, आकर्षक आणि बुद्धिमान असतात. त्या नात्यात स्वतंत्रतेची जागा राखतात. त्यांचा आत्मविश्वास, सुसंवाद आणि प्रसंगावधान इतकं प्रभावी असतं की जोडीदार त्यांच्या शैलीने सहज प्रभावी होतो त्या स्पष्ट बोलतात, पण कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेतात.
मूलांक 6
मूलांक 6 असलेल्या मुली रोमँटिक आणि प्रेमळ असतात, पण त्याच वेळी त्या नात्यावर सौम्य पण ठाम नियंत्रण ठेवतात. त्यांचा कोमल स्वभाव जोडीदाराच्या मनाला मोहून टाकतो. त्या नात्यात कधी जोरजबरदस्ती करत नाहीत, पण त्या जे हवं ते आपल्या प्रभावाने सहज घडवून आणतात.
मूलांक 8
मूलांक 8 असलेल्या मुली गूढ स्वभावाच्या असतात. त्या भावनिकदृष्ट्या खोल असतात, पण त्याचवेळी अत्यंत निष्ठावान आणि ठाम असतात. नातेसंबंधात त्या फार सहजपणे आपलं नियंत्रण प्रस्थापित करतात, आणि त्यांचा जोडीदार देखील त्यांच्या गाभ्याशी प्रामाणिक असतो.
या सर्व मुलींमध्ये एक गोष्ट समान असते, आत्मविश्वास आणि विचारांतील स्पष्टता. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात इतकं सुसूत्रपणा असतो की जोडीदार देखील नकळत त्यांच्या विचारांना महत्त्व देतो. यामुळे नात्याचं नेतृत्व त्यांच्या हाती राहतं.
मात्र या मुलींची खासियत अशी आहे की त्या केवळ आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात असं नाही, तर त्या नात्यात समतोल राखण्याची पूर्ण जबाबदारीही घेतात. त्या खात्री करतात की जोडीदाराला कधीही कमी वाटणार नाही. यामुळेच त्यांचं नातं मजबूत राहतं, आणि त्यांचा प्रभाव अधिकाधिक टिकून राहतो.