कुठे मांस खाणं बंधनकारक, तर कुठे शाकाहारी असणं म्हणजे गुन्हा? ‘या’ देशांमधील विचित्र कायदे ऐकून थक्क व्हाल!

Published on -

जगभरात अन्नाच्या सवयी विविध आहेत, पण काही देशांत या सवयी कायद्याच्या चौकटीत इतक्या अजब पद्धतीने बसवल्या आहेत की त्या ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. काही ठिकाणी शाकाहार बेकायदेशीर मानला जातो, तर काही ठिकाणी मांस न खाल्ल्यास शिक्षा मिळते. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल, तर या देशांमध्ये जाण्यापूर्वी एकदा नियम नक्की वाचा.

फ्रान्स

फ्रान्समध्ये शालेय अन्न व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. तिथे मुलांना शालेय जेवणात मांस दिलं जाणं अनिवार्य मानलं जातं. त्यामुळे जर एखादं मूल शाकाहारी असेल, तर त्याला या व्यवस्थेत अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब फक्त संस्कृतीशी नाही तर त्या देशाच्या पोषणाच्या धोरणांशी जोडलेली आहे.

इटली

इटलीमध्ये तर एक पाऊल पुढे जात 2016 मध्ये एका राजकारण्याने असा प्रस्ताव मांडला होता की जर पालक आपल्या मुलांना पूर्ण शाकाहारी ठेवत असतील, तर त्यांना शिक्षा होऊ शकते. कारण त्या विचारांनुसार, संपूर्ण शाकाहार हे मुलांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. अर्थात, हा कायदा प्रत्यक्षात मंजूर झाला नाही, पण यावरून इटालियन समाजात अन्नसंस्कृती किती संवेदनशील विषय आहे हे लक्षात येतं.

स्वीडन

स्वीडनमध्ये मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळतं. तिथे देशांतर्गत विमानप्रवासात शाकाहारी अन्न डिफॉल्ट स्वरूपात दिलं जातं. तुम्ही वेगळं सांगितलं नाही, तर तुम्हाला शाकाहारीच अन्न मिळणार. इथल्या सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक विचारसरणीला अनुसरून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

अमेरिका

अमेरिकेत मांसाहार सर्वसामान्य आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2001 पर्यंत मॅकडोनाल्ड्सचे प्रसिद्ध फ्रेंच फ्राइजही शाकाहारी नव्हते, कारण त्यात चव वाढवण्यासाठी बीफ फॅट वापरलं जात असे. यावरून अमेरिकन फास्ट फूड संस्कृती किती मांसप्रधान आहे हे दिसून येतं.

चीन

चीनमध्ये काही बौद्ध रेस्टॉरंट्समध्ये लसूण, कांदा आणि अल्कोहोल या गोष्टींना अशुद्ध मानलं जातं आणि त्यावर बंदी असते. ही बंदी अध्यात्मिक शुद्धतेशी निगडीत आहे आणि धार्मिक आचारधर्मांवर आधारित आहे.

अर्जेंटिना

अर्जेंटिनामध्ये तर मांसाहार हे एक प्रकारचं गर्वाचं प्रतीक मानलं जातं. काही रेस्टॉरंट्समध्ये शाकाहारी अन्न मागितल्यासही ते मिळण्याची शक्यता फारच कमी असते. येथे गायीचं मांस हे खास मानलं जातं आणि संपूर्ण देशाची अन्नसंस्कृती त्याभोवतीच फिरते.

पोर्तुगाल

याउलट, पोर्तुगालने 2017 मध्ये एक प्रगतिशील पाऊल उचलून सरकारी रुग्णालये, शाळा आणि इतर संस्थांमध्ये शाकाहारी पर्याय अनिवार्य केला. ही बाब शाकाहार स्वीकारणाऱ्यांसाठी मोठी जमेची गोष्ट ठरली.

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियात शाकाहारी हा शब्द केवळ ‘आरोग्यासाठी चांगला आहार’ या अर्थाने वापरला जातो, आणि तिथे शाकाहार पूर्णपणे समजावून घेणं अनेकदा कठीण जातं.

थायलंड

थायलंडमध्ये अन्नपदार्थांवर पिवळा ध्वज दिल्यास त्याचा अर्थ पूर्णपणे शाकाहारी असा होतो. यामुळे भारतातील हिरव्या ठिपक्याच्या संकल्पनेपेक्षा वेगळ्या प्रकारे शाकाहार ओळखला जातो.

जपान

जपानचा इतिहासही याप्रकरणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. 1872 पर्यंत जपानमध्ये मांस खाणं बेकायदेशीर होतं आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात असे. मात्र नंतर खुद्द सम्राटाने मांसाहार सुरू केला आणि नियमांत बदल झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!