लिपस्टिकसाठी महाग ब्रँडची गरज नाही! स्वतः बनवा ‘ही’ हटके होममेड लिपस्टिक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Published on -

आजच्या काळात सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः लिपस्टिकमध्ये आढळणारे कृत्रिम रंग, सुगंधद्रव्ये आणि इतर रसायने अनेकदा ओठांना कोरडे, काळसर किंवा अॅलर्जीक बनवतात. अशा वेळी नैसर्गिक पर्याय निवडणे अधिक योग्य ठरते. बाजारातील महागड्या लिपस्टिकला पर्याय म्हणून तुम्ही घरच्या घरी केवळ 3 सोप्या गोष्टी वापरून सुंदर लिपस्टिक तयार करू शकता. ही लिपस्टिक केवळ सुंदर दिसत नाही, तर ती आरोग्यासाठी सुरक्षितही ठरते.

आजकाल विविध ब्रँड्सच्या महागड्या लिपस्टिक सहज मिळतात, पण त्यांच्यामध्ये वापरले जाणारे केमिकल्स, कृत्रिम रंग आणि द्रव्यं यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की काही घटकांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो. या गोष्टींपासून वाचण्यासाठी घरगुती लिपस्टिक हा उत्तम उपाय ठरतो. ही लिपस्टिक फक्त स्वस्तच नाही, तर ती पूर्णपणे केमिकल-फ्री आणि त्वचेसाठी देखील चांगली असते.

लागणारे साहित्य

घरी लिपस्टिक बनवण्यासाठी तुम्हाला लागतील, 1 चमचा मधमाशांचं मेण (Beeswax), 1 चमचा नारळाचं टेल अनाई तुमच्या आवडीचा नैसर्गिक रंग (उदा. कोको पावडर, बीटरूट पावडर, जुनं आयशॅडो, हळद, गाजराचा अर्क)

बनवण्याची पद्धत

एका डबल बॉयलरमध्ये 1 चमचा मेण आणि 1 चमचा नारळाचं तेल घ्या. दोन्ही चांगले वितळवून एकसंध मिश्रण तयार करा. त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार नैसर्गिक रंग टाका आणि नीट ढवळा. तयार झालेलं मिश्रण एका छोट्या डबीत किंवा लिप बामच्या डबीत ओता. हे मिश्रण थंड ठिकाणी ठेवा जेणेकरून ते सेट होईल.

ही घरगुती लिपस्टिक ओठांवर लावल्यास त्याचा रंग नैसर्गिक दिसतो, शिवाय नारळाच्या तेलामुळे ओठांमध्ये ओलावा टिकतो. ओठ कोरडे होण्याची समस्या दूर होते आणि त्यांचा रंग हळूहळू गुलाबी होतो. याशिवाय कोणत्याही प्रकारचा एलर्जीचा त्रास होत नाही.

घरची लिपस्टिक बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्वचेच्या टोननुसार तुमचाच खास शेड तयार करू शकता. त्यासाठी फक्त रंगाच्या प्रमाणात थोडा बदल करा. हे सर्व करताना कोणतीही विशेष उपकरणं लागत नाहीत आणि खर्चही अत्यंत कमी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!