Ahmednagar News : संसदेच्या मागील अधिवेशन काळात नगर तालुक्यातील कापुरवाडी-पिंपळगाव उज्जेनी- पोखर्डी तसेच टाकळी काझी -भातोडी- मदडगाव या रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधून या रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी देण्याची मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली होती.
त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे १५ कोटी व ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

याबद्दल नवी दिल्ली येथे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
मा. मंत्री कर्डिले यांनी नगर तालुक्यातील कापुरवाडी- पिंपळगाव उज्जैनी- पोखर्डी तसेच टाकळी काझी -भातोडी- मदडगाव या रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने प्रवाशी नागरिक यांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठे हाल होत होतात.
तसेच इतर गावांना जोडणारा रस्ता असून या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, आता लवकरच संबंधित रस्त्याचे काम मार्गी लागेल आणि प्रवासी नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.