काँग्रेसच्या पुढाकारातून मुकुंद नगरमध्ये सुरू होणार ५० बेडचे कोविड केअर सेंटर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी काँग्रेसच्या पुढाकारातून आणि शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या प्रयत्नातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, जी. एम. मोटर्सचे अब्दुल सलाम, काँग्रेसचे नेते फारुक शेख यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या पुढाकारातून सुरू करण्यात येणाऱ्या या सेंटरच्या ठिकाणी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मुकुंदनगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळणार आहे.

मुकुंद नगरच्या गोविंदपुरा येथील इक्रा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी. ए. इनामदार इंग्रजी माध्यम शाळेमध्ये हे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. संस्थेचे सेक्रेटरी, मॉर्डन कन्स्ट्रक्शनचे इंजि. इक्बाल सय्यद गफ्फुर यांनी या सेंटरसाठी शाळेची इमारत विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खलील सय्यद म्हणाले की, वहदते इस्लामी हिंद, अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने सहाय्य करण्यात येणार आहे.

खिदमते खल्फ फाऊंडेशनचे याकामी विशेष सहकार्य असणार आहे. नुकताच महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा नगर दौरा झाला होता.

त्यावेळी मुकुंद नगर भागासाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याबाबत मान्यता देण्याविषयी ना.थोरात यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उपाध्यक्ष खलील सय्यद,

काँग्रेसचे नेते फारुक शेख यांच्या पुढाकारातून काँग्रेस पदाधिकारी तसेच वहदते इस्लामी हिंदचे संचालक वसीम शेख, अल्ताफ शेख, मौलाना सय्यद जुबेर, अयान शेख, सय्यद मुदस्सर, सय्यद आर्शिद यांनी मागणी केली होती.

फारुक शेख याविषयी माहिती देताना म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना यासाठी तात्काळ मान्यता देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.

याबाबत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्याशी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सविस्तर बैठक झाल्यानंतर या केंद्रास महानगरपालिकेच्या वतीने लेखी मान्यता देण्यात आली आहे.

तसे लेखी मान्यतेचे पत्र आरोग्य अधिकारी बोरगे यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि वहदते इस्लामी हिंद संस्थेच्या संचालकांना सुपूर्द केले आहे. जी. एम. मोटर्सचे अब्दुल सलीम म्हणाले की, या केंद्रावर तज्ञ डॉक्टरांची टीम पूर्णवेळ काम करणार असून

येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना या सेंटर मध्ये मनपाच्या वतीने आरोग्य सुविधांसह जेवण तसेच औषधे देखील पुरविण्यात येणार आहेत. शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून कोरोनासाठी नागरिकांना साहाय्य केले जात आहे.

मुकुंद नगर मधील या प्रकल्पासाठी समस्त मुस्लिम समाज बांधवांचे सहकार्य असून विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख मंडळींनी तसेच मुकुंद नगर मधील सर्व पक्षांचे नगरसेवक समद खान,

असिफ सुलतान, खान बाबा आदींनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सहकार्य केले असल्याची माहिती खलील सय्यद, जी. एम. मोटर्सचे अब्दुल सलाम, फारुक शेख यांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe