Ahilyanagar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया होईल. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुती आपले सरकार कायम राखणार हे स्पष्ट होणार आहे.
यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण देशाचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष लागून राहणार आहे. खरे तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकांकडे साऱ्या राज्याचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही अधिक चुरशीची झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. 48 लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या २८८ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत ४१३६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी ३६८ उमेदवार महिला आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांसह ९.७ कोटी मतदार बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पण तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्रातील 31 उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत.
यातील दोन उमेदवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत जे त्या मतदारसंघाचे मतदारचं नाहीत. यामुळे या उमेदवारांना स्वतःलाच मत देता येणार नाहीये.
प्रत्येक पक्षाने बाहेरच्या उमेदवारांना वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारी दिल्याचे चित्र आहे. दरम्यान आता या सर्वपक्षीय ३१ उमेदवारांनी स्थानिक मतदारांकडून मते मागितली आहेत, पण ते स्वत:ला मतदान करू शकणार नाहीत. आता आपण राज्यातील कोणते असे 31 उमेदवार आहेत जे स्वतःला मत देऊ शकणार नाहीत याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
अहिल्या नगर जिल्ह्यातील या दोन उमेदवारांना स्वतःला मत देता येणार नाही
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांना स्वतःला मत देता येणार नाही ते महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांना देखील स्वतःसाठी मत देता येणार नाही. ते बारामती विधानसभा मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
राज्यातील या उमेदवारांना स्वतःला मत देता येणार नाही
नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस, वरळी -आदित्य ठाकरे, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, नंदुरबार – विजयकुमार गावित, श्रीवर्धन – आदिती तटकरे, वरळी – मिलिंद मुरली देवरा, मानखुर्द शिवाजीनगर – नवाब मलिक, अक्कलकुवा – हिना विजय गावित, कारंजा – ययाती मनोहर नाईक, कुडाळ – निलेश नारायण राणे, लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, औरंगाबाद पूर्व – इम्तियाज जलील, कळमनुरी – संतोष बांगर,
आर्णी – जितेंद्र मोघे, दर्यापूर – अभिजीत अडसूळ, लोहा – मीनल खतगावकर, सावनेर – आशिष देशमुख, अकोला पश्चिम – विजय अग्रवाल, गंगापूर -सतीश चव्हाण, जत – गोपीचंद पडळकर, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, कोपरी पाचापाखाडी – केदार दिघे, कुडाळ – वैभव नाईक, मालाड पश्चिम – विनोद शेलार, मुंबादेवी – शायना एनसी मुनोत, राळेगाव – अशोक उईके, सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख