Ahilyanagar Politics : सुजय विखे राज्यात नकोत ! आमची मंत्रीपदे अडचणीत…भाजप आमदार हे काय बोलले ?

Published on -

Ahilyanagar Politics : आ. शिवाजी कर्डीले हे त्यांच्या रोखठोक बोलण्याने परिचित आहेत. अनेकदा ते विखे पाटील यांनाही चिमटे काढत असतात. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा एक राजकीय वक्तव्य केलं आहे. आ. शिवाजी कर्डीले यांनी म्हटले की, लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांचं पुनर्वसन करणार असून त्यांना केंद्रात अर्थात राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याची सर्वतोपरी तयारी करत आहोत.

त्यांची राज्यात नव्हे तर केंद्रात गरज आहे. त्यांनी राज्यात येऊच नये, याचे कारण असे की, सुजय विखे पाटील राज्यात आले तर आमचे मंत्रीपद धोक्यात येईल. त्यामुळे आम्ही त्यांचे पुनर्वसन करणार पण केंद्रात करणार, राज्यात नव्हे असा मिश्किल टोला आ. कर्डीले यांनी यावेळी मारला.

त्याच झालं असं की, नगर तालुक्यातील अकोळनेर येथे धर्मबीज सोहळ्याच्या धर्मध्वज अनावरण सोहळा पार पडला. यावेळी डॉ. खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले, ‘व्यासपीठावर असलेले दोन आजी आमदार आहेत. मात्र मी माजी खासदार असून मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो’ असं त्यांनी म्हटलं होत. टॉवर बोलताना आ. कर्डीले यांनी वरील वक्तव्य केले.

अकोळनेरमध्ये भव्य कार्यक्रम

तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा १५ एप्रिल ते २३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे ध्वजारोह शुभारंभ दि.३१ मार्च रोजी डॉ. खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, संदेश कार्ले, हभप माऊली महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

अकोळनेर (ता.अहिल्यानगर) येथे १५ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान येथे जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळाचे भव्य आयोजन सरपंच प्रतिक शेळके व ग्रामस्थांनी केले
आहे. हा सोहळा श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यात मिळून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe