Ahmednagar Politics : आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास साधला आहे. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चांगली बांधणी केलेली आहे.
शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमदार राजळे यांच्या कामाची पावती असून, पुढील काळातही मी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे राजळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

या वेळी पाथर्डी शेवगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नूतन सदस्यांचा सत्कार राजळे यांनी केला.आमदार राजळे यांनी तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमात खा. विखे बोलत होते.
पुढे बोलताना विखे म्हणाले, भाजपची मुंबईत बैठक असल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. गेल्या दोन वर्षांच्या काळात राजळे यांनी मोठी विकासकामे केल्याने जनता त्यांना साथ देते, हे दिसून आले आहे.
येत्या काही दिवसात आपण, आमदार राजळे व पालकमंत्री विखे यांची संयुक्त बैठक घेणार असून, त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या योजनांवर चर्चा करून अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजना कोणत्या आहेत, ते योग्यवेळी जाहीर करू.
अक्षय कर्डिले म्हणाले, राजळे व कर्डिले घराण्याचे खूप जवळचे संबंध असून, महिला असूनही राजळे यांचा कामाचा झपाटा खूप मोठा असल्याने आगामी विधानसभेला त्या हॅटट्रिक नक्कीच करतील.
पुढच्या मंत्रिमंडळात त्यांना नक्कीच लाल दिवा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दिवाळी फराळ समारंभाला पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित होते.
या वेळी राहुल राजळे, कृष्णा राजळे, माणिक खेडकर, अभय आव्हाड, उद्धव वाघ, सुभाष ताठे, सुभाष बर्डे, विष्णुपंत अकोलकर, शेषराव कचरे, अमोल गर्जे, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, सुनील ओव्हळ, बबन सबलस आदी उपस्थित होते.