Ahmednagar Politics : भाजप पक्षनिरीक्षकांची नगरमध्ये समीक्षा बैठक ! विखेंसह आ. राजळे, आ.पाचपुते आलेच नाहीत, भाजपात नाराज?..

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आगामी नियोजनाला लागले आहेत. महायुतीतील मोठा भाऊ असलेला भाजप मात्र अजूनही पराभवातून सावरलेला नाही. पराभवाची कारणे शोधण्याचे काम सध्या भाजपकडून सुरु आहे.

याच अनुशंघाने नगरमध्येही भाजपची समीक्षा बैठक पार पडली. खासदार तथा पक्षनिरीक्षक प्रा. मेधा कुलकर्णी यांनी ही बैठक घेतली. नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभा पराभवाचे विश्लेषणाचा अहवाल २१ जूनला केंद्राकडे सादर केले जाणार असल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.

भाजपची लोकसभा निवडणुकीची समीक्षा व विधानसभा निवडणूक आढावा बैठक कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली असली तरी सध्या एका मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधले असून चर्चांना उधाण आले आहे.

ते म्हणजे या बैठकीला माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते व प्रा. राम शिंदे यांनी पाठ फिरवली. या बैठकीला जे पदाधिकारी गैरहजर होते, त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवणार असल्याचे नगर दक्षिण मतदारसंघातील स्पष्ट केले.

जिल्हा भाजपात शांतात का?
जिल्हा भाजपमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. त्यात भाजपचे राज्याचे नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरू आहे. नेतृत्व बदलल्यास पदाधिकारी बदलतील, अशी शक्यता आहे. हेही भाजप पदाधिकाऱ्यांच्या मौनामागील कारण असण्याची शक्यता आहे.

राजळे, पाचपुते का गैरहजर?
दरम्यान आ. राजळे व आ. पाचपुते का गैरहजर राहिले याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. विधानसभेला या दोघांनाही तिकीट दिले जाणार नाही अशा शक्यतांवर सध्या नागरिकांत चर्चा आहे. त्यामुळे यांनी या समीक्षा बैठकीला दांडी मारली का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या खा. मेधा कुलकर्णी?
लोकसभा निवडणुकीबाबत तालुकाध्यक्ष, निवडणूक प्रमुखांशी सविस्तर चर्चा करून त्याचा अहवाल केंद्राला पाठवणार आहे. यात निवडणुकीच्या पराभवाच्या विश्लेषणाबरोबरच प्रामुख्याने काय राहून गेले, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारने ४०० पारचा नारा दिला होता, मात्र विरोधकांनी संविधानाबाबत केलेल्या प्रचाराचा फटका बसला.

संविधान बदलाचा कुठलाही आमचा अजेंडा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कधीच बदलणार नाही. काँग्रेसच्या काळात अनेकदा संविधानात बदल झाले. मात्र, लोकांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडल्याचे त्या म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe