शरद पवारांचे अहमदनगरमध्ये ‘लक्ष्य’ ! भाजपचा मोठा प्रस्थापित नेता ‘तुतारी’ वाजवणार? लवकरच भूकंप

लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा करिष्मा करून दाखवला. संपूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही त्यांची जादू चालली. अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही खासदार त्यांच्या करिष्म्यामुळे निवडणून आले.

Ahmednagarlive24 office
Published:
pawar

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा करिष्मा करून दाखवला. संपूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही त्यांची जादू चालली. अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही खासदार त्यांच्या करिष्म्यामुळे निवडणून आले.

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळाले. आता शरद पवारांचे अहमदनगरमध्ये लक्ष (‘लक्ष्य’) असून नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करणार आहेत अशी चर्चा सध्या सुरु झालीये.

अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रस्थापित भाजपचा नेता हाती तुतारी घेण्याच्या तयारीत आहे.

कोण आहे हा नेता?
कोपरगावची जागा महायुतीत विद्यमान आ. आशुतोष काळे यांना मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे ही परंपरागत लढत होत आली आहे. त्यामुळे काळेंना ही जागा मिळाली तर कोल्हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील, अशी सर्वात जास्त शक्यता आहे.

मध्यंतरी, गणेश परिसरातील त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही महत्वपूर्ण ठरते. आता लवकरच कोल्हे-पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने एकाच बैठकीत एकत्र येणार असल्याने त्यांच्यात तुतारी हाती घेण्याबाबत राजकीय चर्चा होतील असे म्हटले जात आहे.

त्यामुळे यंदा विवेक कोल्हे फडणवीसांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चां वाढल्यात.

कोण आहेत विवेक कोल्हे?
शंकरराव कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते होते. विवेक कोल्हे हे त्यांचे नातू आहेत. भाजपचे आमदार राहिलेल्या स्नेहलता कोल्हे यांचे ते सुपुत्र आहेत.

संजीवनी साखर कारखाना व गणेश कारखाना या माध्यमातून कोपरगाव व शिर्डीमध्ये सहकारात वर्चस्व आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe