Ahmednagar Politics : माजी खा. सुजय विखे पाटील सध्या विविध राजकीय गोष्टींचा आढावा घेत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर ते आता विधानसभेची रणनीती आखू लागले आहेत. याच अनुशंघाने त्यांनी काल एक मोठं वक्तव्य केलं होत.
ते म्हणाले होते, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे.
राहुरी व संगमनेर मधून मी लढू शकतो असे ते म्हणाले. दरम्यान आता याच मुद्द्यावरून माजी मंत्री आ. थोरात यांनी टीका करत खिल्ली उडवली आहे.
त्यांना सुजय विखे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ते मोठ्याचे बालक आहे. त्यामुळे बालकाचा छंद पुरवला पाहिजे.
नेमके काय म्हणेल आ. थोरात
थोरात यांना सुजय विखे हे संगमेनर किंवा राहुरीतून उभे राहतील का याबाबत विचारले असता ते म्हणाले, ते मोठ्याचं बालक आहे. लाडक्या लेकराचा छंदच असेल तर तो पुरवला गेला पाहिजे असे मला वाटते. पक्षाने नव्हे तर पालकाने हा छंद पुरवला पाहिजे असे ते म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले की, सुजय विखे हे दोन ठिकाणी लढू असे म्हटलेत त्यामुळे आता त्यांचा छंद पुरवण्यासाठी त्यांना दोन्ही ठिकाणी उभे केले पाहिजे, असे केले तर निदान बालकाचा छंद तर पुरा होईल असे म्हणत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.