निलेश लंकेंना नेमके काय लागत होते? अजित दादांचा गौप्यस्फोट अन लंकेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला..

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकनिष्ठ मानले जाणारे खा. निलेश लंके लोकसभेला शरद पवार गटात आले आणि त्यांनी तिकीट मिळवत निवडून येऊनही दाखवलं. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा.निलेश लंके यांच्याविषयी काही वक्तव्ये केली होती.

त्यात त्यांनी असही म्हटलं होत की, खा. निलेश लंके यांनी आपण लोकसभा लढवू मात्र पत्नीला विधानसभेचं तिकीट द्या अशी मागणी त्यांची होती असे आता दादा म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाणही आले.

दरम्यान आता याच अनुशंघाने खा. निलेश लंके यांना विचारले असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात शिळ्या कढीला ऊत देण्यात काही अर्थ नाही असे म्हणत थेट प्रतिक्रिया न देण्याचे पसंत केले.

काय म्हणले खा. लंके
अजित दादांच्या वक्तव्यावर खा. लंके म्हणाले, मी सध्या वारीमध्ये आहे. त्यामुळे दादा जे काही बोलले असतील ते मी ऐकले नाही.

परंतु आता मागील कोळसे उगळण्यात काय अर्थ आहे, मी आता खासदार झालो आहे, त्यामुळे झालं गेलं सर्व गंगेला मिळालं असे म्हणत शिळ्या कढीला ऊत देण्यात काही अर्थ नाही असेही ते म्हणाले.

खा. लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर देणे का टाळतात?
एका मीडियाने नुकत्याच घेतलेल्या मुलाखती मध्ये खा. निलेश लंके यांना तुम्ही थेट अजित दादांना उत्तर देणे का टाळता असा प्रश्न विचारला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होत की, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहिले पाहिजे. दादा हे खूप मोठे नेते आहेत.

त्यांचं कर्तृत्व मोठे आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे दादांबद्दल काही बोलणे ही माझी कुवत नाही. दादा मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणे योग्यच ठरत नसल्याचे ते म्हणाले होते.