Ahmednagar Politics : ..आणि शरद पवारच म्हणतील अहिल्यानगर बदललय ! पवारांच्या नगर दौऱ्यावर खा. सुजय विखेंची नम्र पण ‘खास’ प्रतिक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (शुक्रवार) नगर दौऱ्यावर आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबणार असून ते रात्री येथे सभा देखील घेणार आहेत.

दरम्यान आता या दौऱ्याबाबत खा. सुजय विखे यांच्याशी मीडियाने संवाद साधला असता त्यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले खा. सुजय विखे पाटील

शरद पवार साहेबांचे आम्ही नगरमध्ये स्वागत करतो. ते आता पाच वर्षानंतर अहमदनगरमध्ये येतायेत. बहुतेक पाच वर्षात त्यांना त्यांच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळाला नसावा. आता ते पाच वर्षानंतर येतायेत तर त्यांनी नव्याने केलेल्या फ्लायओहर ने यावे.

नव्याने झालेल्या बायपास ने यावे, नवीन झालेल्या रस्त्याने यावे. कारण यातून त्यांना बदललेलं अहिल्यानगर दिसलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तसेच त्यांच्या ज्या पाच ठिकाणी सभा लावल्या आहेत त्या पाच ठिकाणी देखील त्यांनी आम्ही केलेला विकास,

प्रधानमंत्री मोदी यांनी केलेला झालेला विकास पाहावा अशी माझी इच्छा आहे. हे पाहिल्यावर ते नक्कीच अहिल्यानगर आता बदललं आहे आणि सकारात्मक बदल झाला आहे असे म्हणतील अशी मला खात्री आहे असे खा. सुजय विखे म्हणाले.

विखे-पवार अशी लढत

अहमदनगरमध्ये लंके व विखे यांची लढत असली तरी ही खरी लढत विखे व पवार यांच्यात आहे असे म्हटले जाते. अनेक लोकही ही लढत अशीच पाहत आहेत. विखे व पवार कुटुंबियांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे.

अनेकदा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे ही लढत आता लक्षणीय होणार असून अनेकांचे लक्ष अहमदनगरच्या निकालाकडे असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe