Ahmednagar Politics : दिल्ली अब दूर नही ! आमदार निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील वृत्तपत्रांत पाने भरून जाहिराती

Published on -

Ahmednagar Politics : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदार सांघातून खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत.

परंतु येथे भाजपचे खासदार सुजय विखे स्टँडिंग उमेदवार असल्याने व राज्यात महायुती असल्याने ही जागा भाजप राहील व व नीलेश लंके यांना तिकीट मिळणे जरा अवघड होईल असे वाटत होते.

परंतु आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध प्रसारमाध्यमे असतील किंवा इतर ठिकाणी ‘अब दिल्ली दूर नही’ अशी जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे आ. निलेश लंके यांचे फिक्स ठरले आहे अशा चर्चांना उधाण आले आहे. निलेश लंके हेच उमेदवार असू शकतात या मागे काही घडामोडी काही शक्यता आहेत. त्याविषयी आपण याठिकाणी पाहुयात

१) अजित पवारांची राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी आग्रही

मुंबईमध्ये अजित पवार यासिनच्या राष्ट्रवादीची अहमदनगर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. यावेळी अहमदनगर लोकसभा मतदार संघ आपणाकडे घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

दक्षिणेतील विविध सहकारी संस्था असतील किंवा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे संख्याबळ असेल ते जास्त आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच असावी अशी आग्रही मागणी या बैठकीत झाली असे सांगण्यात येत आहे.

२) आ. लंके यांना थांबवण्यासाठी अजित पवारही प्रयत्नशील

आ. निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील व लोकसभा लढवतील असा सध्या सूर सर्वत्र आहे. त्यामुळे आ. निलेश लंके यांना राष्ट्रवादीच्याच थांबवण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत.

कारण लंके यांनी साथ सोडल्यास पुढील विधानसभेचीही गणिते अवघड होतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे लंके यांना राष्ट्रवादीच्याच थांबवण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीकडे यावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत.

३) अब दिल्ली दूर नही

आ. निलेश लंके यांच्या आजच्या अब दिल्ली दूर नही या जाहिरातींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचाच अर्थ आ.निलेश लंके यांच लोकसभेचे ठरलंच आहे अशी चर्चा आहे. संधी मिळाली तर महायुतीकडून अन्यथा शरद पवार गटाकडूनही त्यांची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

तसेच स्वतः लंके यांनी देखील अद्याप आपण नेमके कोणत्या पक्षाचे आहोत हे देखील स्पष्ट केले नही. त्यामुळे पक्ष कोणताही असो उमेदवारी करायचीच असेच या जाहिरातींमधून त्यांना सुचवायचे तर नही ना अशी चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe