विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले.

सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, विजय हिंगे, विनायकराव थोरात, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या 4 ते 5 निवडणुका अटीतटीने झाल्याचे चित्र दिसले. मात्र, या संस्थेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शेतकी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे वर्चस्व राहिले.

या निवडणुकीत संगमनेर दूध संचालक विक्रम थोरात, माजी उपसरपंच विनायकराव थोरात, सरपंच गणपत हजारे, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, माणिरकराव पाबळ, शरदराव जाधव, सूर्यभान थोरात, आबासाहेब जाधव, बाळासाहेब तळेकर, दिनकर कदम आदींसह कार्यकर्त्यांनी विजयासाठी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe