माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळंच सांगितल ! भाजपला सत्तेसाठी पक्ष फोडावे लागतात…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक असायला हवेत, परंतु आज ते दिल्लीत आहेत. त्यांचे आई- वडील शेतकरी आहेत आणि त्यांनाच रोखले जात आहे.

त्यासाठी मोठी भिंत लावली जात आहे. रस्त्यात खिळे टाकले जात आहेत. भाजपला सत्तेसाठी इतर पक्ष फोडावे लागतात. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

श्रीरामपूर येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, कुणी भ्रष्टाचारी व्यक्ती भाजपमध्ये आला, तर तो धक्का काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही, तर भाजपलाच आहे. असे धक्के आम्ही अनेक पचवले आहेत. सडलेले पानं गळाले की नवे कोंब फुटतात.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दुष्काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते; परंतु ते ते मोदींच्या दारात गेले. जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याची भाजपची ताकद नाही. त्यांना सत्तेसाठी पक्ष फोडावे लागतात.

दिल्लीच्या वेशीवर धुमशान चालू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. ज्यांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, ते शेतकरी तुमच्या घरी आले, तर तुम्हाला का चालत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान मोदी धान्य पिकवत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय बोलावे फरक पडत नाही. अशी टीका त्यांनी केली. घाबरणाऱ्यांनी खुशाल भाजपमध्ये जावे. त्यांनी इथून निघून जावे. मी त्यांच्यासाठी नाही, तर जनतेसाठी मैदानात उतरलो आहे, असे ठाकरे म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख लखन भगत, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, शहरप्रमुख रमेश घुले, विधानसभा संघटक संजय छल्लारे,

विधानसभा समन्वयक एकनाथ गुलदगड, तालुका संघटक सदाशिव पठारे, महिला आघाडी जिल्हा संघटक शारदा कदम, महिला आघाडी तालुका संघटक कल्पना वैद्य, शिव आरोग्य सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. महेश क्षीरसागर,

यासीन सय्यद, उपशहर प्रमुख रोहित भोसले, शहर सचिव राहुल रणधीर, मच्छिद्र पठारे, माजी युवासेना शहरप्रमुख निखिल पवार, युवासेना शहरप्रमुख सिद्धांत छल्लारे,

माजी युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक यादव, अजित गुंजाळ, श्रीकांत गुंजाळ, उपशहर प्रमुख सुनिल फुलारे, दिनेश पोपळघट, सागर हारके, किशोर ढोकचौळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe