Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यामुळे राजकारण वातावरण चांगलेच तापले आहे. आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती, असे पडळकर म्हणाले.
असे असताना आता शरद पवारांसाठी आरपीआय खरात पक्ष पुढे सरसावला आहे. पडळकर यांच्या विधानाचाही निषेध करतानाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडा अभ्यास करा असा सल्ला आरपीआयचे सचिन खरात यांनी दिला आहे.
तसेच शरद पवार यांनी मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करून बहुजन समाजाला न्याय दिला असल्याचे ते म्हणाले. बहुजन समाजाला आरक्षण दिले. पडळकर यांनी त्यांच्या जिभेला लगाम दिला नाही तर बहुजन समाज त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करेल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.
यामुळे आता पडळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोक देखील पवारांच्या जवळचेच होते, असेही पडळकर म्हणाले होते. या सर्वांचा सूत्रधार एक आहे, म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो.
शरद पवारांनी घाण व नीच काम केले आहे, असेही ते म्हणाले. तसेच शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सरकार फुल स्ट्रॉंग आहे, असे म्हणत पडळकरांनी पवारांवर जोरदार टीका केली होती.