बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने मोठा झालो – खासदार संजय राऊत

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : वंजारवाडी गाव हे छोटे असले, तरी या गावाचे नाव मोठे आहे. या गावात आलो, त्याचा मोठा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत आहे. ठाकरे परिवाराच्या परिस्पर्शाने मोठा झालो, असल्याचे पतिपादन ठाकरे गट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

संत वामनभाऊ व संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाकरे गट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख विष्णु महाराज केंद्रे यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत पत्रकार संजय राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी पंढरीनाथ महाराज तांदळे, अतुल महाराज आदमने, माजी आमदार पांडुरंग अभंग, शिवसेना उपनेते साजन पाचपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपचे नेते दिनकरराव गर्जे, भगवान दराडे, संजय आव्हाड उपस्थित होते.

आमदार गडाख यांनी नेवासा तालुक्यात फार मोठे काम केले आहे, त्यांना या मातीचा गुण लागल्याचे सांगत त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना त्वरित मंजुरी देत असल्याचे सांगितले.

आलेल्या पाहुण्यांचा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव दराडे, सदस्य रामेश्वर दराडे, ईश्वर दराडे, सुदाम डोळे, मल्हारी दराडे, संभाजी दराडे, ज्ञानेश्वर दराडे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल महाराज आदमने यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. दिनांक २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत वंजारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe