Kapil Sibal : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवल जात आहे. जे लोक इडीच्या केसमध्ये अकडले होते, ते लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरील केसेस बंद करण्यात आल्या आहेत.
केवळ विरोधकांसाठी याचा उपयोग केला जात आहे. भाजप विरोधात देशभरात एक आंदोलन सुरु झाले पाहिजे. त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्र आले पाहिजे. मला राज्य सरकारांनी बोलावले तर मी तेथेही जाईल, असेही सिब्बल म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, इडीचा वापर, विरोधकांना संपवण्यासाठी होत. भाजप सरकारमधील किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याच्या विरोधात इडीने काहीच कारवाई केली नाही. देशातील वकिलांनी एकत्र येवून आपला आवाज उठवला पाहिजे.
अनेक देशांमध्ये सरकार विरोधात वकीलांनी आवाज उठवला आहे. मात्र, आपल्या देशातील वकील बोलत नाहीत. यासाठी आम्ही एक वेबसाईट सुरु केली आहे. त्या वेबसाईटचे नाव आहे, ‘इसाफ के सिपाई’ नावाने वेबसाईट सुरु केली आहे.
या माध्यमातून आंदोलन करणार आहे. २०१४ नंतर देशात आठ सरकारे पाडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील सरकारे, पाडली आहेत. देशातील निवडणून येणारी सरकारे पाडली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच इडी कुठेही जाऊ शकते, त्यामुळे इडीच्या माध्यमातून लोकांना धमकावले जात आहे. देशातील विरोधी पक्षाच्या १२१ नेत्यांच्या विरोधात इडीने कारवाई केली. ज्या लोकांवर इडीच्या केसेस होत्या, ते लोक भाजपसोबत आले, असेही ते म्हणाले.