‘किरीट सोमैया सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवतात’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया हे सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवतात असा आरोप करत त्यांना अटक करावी अशी मागणी मनसेने केली आहे.

किरीट सोमैया यांनी सोमवारी ट्वीट करून ग्रँट रोड येथे एक महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ ट्वीट करून ती कोरोना त्रस्त असल्याचे आणि अँम्ब्युलन्सची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले होते.

तर मुंबई पोलिसांनी सोमैया यांना ट्वीटरवरच उत्तर देताना, तो व्हिडिओ १६ मे रोजीचा असल्याचे आणि ती महिला कॉन्स्टेबल कोरोना बाधित नव्हती आणि पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते.

आता किरीट सोमैया यांनी एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ ट्वीट केला असून महिला कॉन्स्टेबल रस्त्यावरच कोसळली असताना सोबत असलेल्या पोलिसांपैकी कुणीच मदतीला आले नाही असं सांगत सोमैयांनी हा विषय राज्यपालांकडे उपस्थित केल्याची माहिती दिली आहे.

त्यामुळे किरीट सोमैया हे विनाकारण कोणतेही व्हिडीओ अपलोड करून सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवत आहेत असा आरोप मनसेने केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment