Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या हालचाली सुरु आहेत. भाजपने बाकी दोन मोठे पक्ष फोडून आपली ताकद वाढवली. आता सुप्रिया सुळे या रणांगणात उतरल्या आहेत. त्या विविध ठिकाणी दौरे करून पुन्हा एका कार्यकर्त्यांची मोट बांधत आहेत.
या दरम्यान भाजपने इतर पक्षांना खिंडार पडून त्यातील मातब्बर नेते सोबत घेतले. परंतु पक्ष सोबत असणाऱ्या व कधी काळीं पक्षाची मोठी ताकद असणाऱ्या माणसांवर राजकीय अन्याय देखील केला अशी चर्चा आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे पंकजा मुंडे.
सध्या पंकजा मुंडे यांची राजकीय स्थिती भाजप मध्ये कशी आहे हे वेगळे सांगयला नको. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार का? असे चिन्ह दिसू लागले आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे व पंकजा मुंडे या एकत्रित येणार अशी शक्यता दिसायला लागली आहे.
त्याच कारण असे की सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांची जोरदार बाजू उचलून धरली आहे. विशेष म्हणजे या दोघींचे पुनर्वसन करा अन्यथा मी करेल असे थेट आवाहनच त्यांनी भाजपला केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, पंकजा बद्दल मला आदर वाटतो.
कारण ती एकटीच लढत आहे. तिचे वडील गेले. त्यांच्या घरात एकही कर्ता पुरुष नाही. 1995 मध्ये भाजप सत्तेत आला तेव्हा दोन नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारविरोधात लढा दिला होता आणि ते सत्तेत आले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे हे ते दोन नेते होते. आता ते हयात नाहीत.
परंतु आज भाजप त्यांच्याच मुलींना कशी वागणूक देत आहे, असा सवाल केला. या सोबतच त्या म्हणाल्या की, बेटी पढाओ, बेटी बचाओ असा तुमचा नारा आहे. मग आधी या दोन ( पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे) आमच्या बेट्यांचं कल्याण करा.
तुम्ही करू शकत नसाल तर मोठी बहीण म्हणून मी करेन, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पुनर्वसन करावे किंवा त्यांना कुठेतरी सत्तेत स्थान द्यावे, अशी सूचना केली आहे. अन्यथा मी स्वतः त्यांचे पुनर्वसन करेल असे म्हटले आहे. आता त्यांच्या याच वक्तव्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात सुप्रिया सुळे याना देखील मोठ्या आधाराची गरज आहे. पंकजा ताई मुंडे व प्रीतम मुंडे या महाराष्ट्रातील मोठा राजकीय चेहरा आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे व सुप्रिया सुळे या एकत्रित येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्यात राजकारणात काहीही होऊ शकते हे मागील काही दिवसांच्या घडामोडींवरून कळले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे प्रतिमा मुंडे व सुप्रिया सुळे या एकत्रित येऊन मोठी राजकीय ताकद उभा करू शकतात हे नाकारता येणार नाही.