Maharashtra News : राष्ट्रवादीचे नगरसेवक पवनराजे राळेभात पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह चौंडी येथे आ. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
या वेळी आ. शिंदे म्हणाले की, भाजपाच्या लोकांना त्रास देऊन प्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाजपात कार्यकर्ते मनाने प्रवेश करत आहेत. कोणावरही कसलाही दबाव नाही.
तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख व जामखेडचे सरपंच कै. महादेव राळेभात यांनी हिंदुत्वाचा विचार ठेवला, आज पुन्हा पवनने भाजपाची विचारधारा स्विकारली आहे. पवनच्या माध्यमातून शहरात विकासाचे चांगले काम करता येणार आहे.
आडवा-आडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजपा कधीच करत नाही. विरोधकांनी लोकांना त्रास देत प्रवेश घेतले होते, आता पुन्हा परतत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
‘भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, कर्जतचे भाजप युवानेते सचिन पोटरे, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चितामणी, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, अॅड. प्रविण सानप,
नगरसेवक बिभीषण धनवडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे, संपत राळेभात, अर्जुन म्हेत्रे, सौ. अर्चना राळेभात, खडर्याच्या सरपंच संजीवनी पाटील, माजी सभापती गौतम उतेकर, जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड, युवानेते उपसरपंच प्रशांत शिंदे, सरपंच पै. बाबा महारनवर, युवानेते बाजीराव गोपाळघरे,
जवळा ग्रा.पं. सदस्य युवा नेते राहुल पाटील, तात्याराम पोकळे, उद्धव हुलगुंडे, चेअरमन नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, जाकीर शेख, नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे, डॉ. राळेभात यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.