Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
“मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.
मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली.
यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.