Ahmednagar Politics : जनतेच्या पैशाची लूट केली, तुम्ही आधी आपला कारभार नीट सांभाळा..महसूलमंत्री विखे पाटलांचा रोहित पवारांवर घणाघात

 Ahmednagar Politics : सध्या राजकीय वातावरणच चांगलेच तापलेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. परंतु हे आरोप आता वैयक्तिक पातळीवर आले असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यात देखील आता हा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे.

नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी पदाच्या भरतीत गैव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी वरही त्यांनी भाष्य केलं होते. आता यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिउत्तर देत आ.रोहित पवारांवर घणाघात केलाय.

ते म्हणाले, ज्यांना स्वतःचा कारभार नीट सांभाळता आला नाही, ज्यांनी जनतेच्या पैशाची लूट केली आहे. आता ते सरकारवर आरोप करत आहेत. त्यांनी सरकारची बदनामी केली आहे. त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. ईडीच्या चौकशीत पुढे येणारच असल्याचे ते म्हणाले.

नगर मध्ये भाजप राष्ट्रवादी, शिवसेना आरपीआय व घटक पक्ष या महायुतीचा महासंकल्प २०२४ ही बैठक पार पडली. या बैठकीत विखे यांनी हा घणाघात केला. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले,

१४ जानेवारीला एकाच वेळेस महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत महायुतीचे मेळावे होणार आहेत. पहिल्यांदाच हे एकत्र मेळावे होणार आहेत. बुधवारचा ऐतिहासिक निकाल झाल्यामुळे सरकार आणखी मजबुतीने काम करणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे.

त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. हे स्पष्ट झाले आहे. तलाठी पदाची भरती पारदर्शकपणे झाली आहे. विनाकारण मुलांमध्ये मतभेद व बुद्धिभेद करू नये, असे विखे यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe