Pune Loksabha : 2024 मध्ये काँग्रेसचा पुण्याचा लोकसभेचा उमेदवार ठरला?भाजपला धक्का देण्याची आखली रणनीती..

Ahmednagarlive24 office
Published:

Pune Loksabha : पोटनिवडणूकीमुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत जागा खेचून आणली. यामुळे आता आता लोकसभेचे वेध सर्वांना लागले आहे. तसेच एका नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे. हे नाव म्हणजे रवींद्र धंगेकर.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर उमेदवार असल्यास जागा जिंकता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आनंदात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील रणनीती आखली तर काँग्रेसला चांगले दिवस येतील. २०१४ नंतर पुण्यात काँग्रेस कुठेच दिसली नाही. पुणे शहराचा खासदार आणि आमदारही भाजपचे झाले. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा आठ वर्षाचा आमदारकीचा वनवास संपला.

पुणे हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवारांशिवाय पानही हालत नव्हते. मात्र मोदी लाटेत परिस्थिती बदलली.

२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महापालिका आणि विधानसभेतही या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. आता पुन्हा असेच दिवस येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe