आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली, आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील; राधाकृष्ण विखे पाटील यांचा थोरातांवर जोरदार हल्ला

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत. त्यांनी नुकताच शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत, मोटारसायकल रॅलीने जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

Published on -

Radhakrishan Vikhe Patil On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत.

त्यांनी नुकताच शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत, मोटारसायकल रॅलीने जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

या निमित्ताने आयोजित विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी माजी महसूल मंत्री अन संगमनेरचे विद्यमान आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वाळू आणि खडी माफियांच्या जीवावर दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

ज्यांना आपल्या मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, ते टँकरमुक्त शिर्डी मतदारसंघात विकासाची भाषा करतात. आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली. आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचा समाचार घेतला.

पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी, टोळ्या आणि माफियांच्‍या जीवावर दहशत निर्माण करणाऱ्या संगमनेरच्‍या नेत्‍यांचा चेहरा आता राज्‍याला कळून चुकलाय. यामुळे राहता तालुक्‍यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

गणेश कारखाना चालवायला घेतला म्‍हणून तो शेतकऱ्यांच्‍या मालकीचा राहिला. समन्‍यायी पाणीवाटप कायद्याचे भूत त्यांच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले असं म्हणतं विखे पाटील यांनी पाण्याच्या मुद्द्याला हात घातला. तसेच, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटा वर्ग एकच्या भोगवटा दोन केल्या.

शिर्डी आणि कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी जवळपास नऊशे एकर जमीन मोफत उपलब्ध करून दिली. निळवंडे कालव्यांची कामे मार्गी लावली. जिल्‍ह्याच्‍या नामांतराबरोबरच नेवासे येथील ज्ञानेश्‍वर श्रुष्टी, अहिल्‍यादेवींचे राष्‍ट्रीय स्‍मारक उभारण्‍याचा निर्णय झाला.

ते महसूलमंत्री असताना ही कामे का झाली नाहीत ? असा सवाल उपस्थित करत महसूलमंत्र्यांनी थोरात यांना चांगलेच फैलावर घेतले. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरात आणि विखे यांच्यातील संघर्ष हा टोकाला पोहोचला आहे.

दरम्यान आगामी काळात या संघर्षाला आणखी धार येणार आहे. एकंदरीत यंदा शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक फारच रंजक होणार असून विखे आणि थोरात हे पहिल्या फळीतील नेते आमने-सामने राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe