Raju Shetty : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीसोबत जाऊन लढली होती. त्याठिकाणी शेतकरीहिताचे निर्णय होत नसल्याचे दिसून येताच शेट्टी यांनी २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन निवडणूक लढवली होती.
नंतर त्यांनी महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवली. मात्र तेथेच त्यांचे जमले नाही. आता त्याबाबत शेट्टी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढत होती, तेंव्हा लोक ताकदीने आमच्या सोबत उभे होते.
आम्ही महायुती महाविकास आघाडीसोबत गेलो, ती आमची चूक होती. ती पुन्हा होणार नाही. आता आम्ही स्वतंत्रपणेच लढू, अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी मांडली आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजू शेट्टी हे स्वतंत्रपणे लढणार आहेत.
ते म्हणाले, प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे. शेतकरी हिताला बाधा येईल, अशीच धोरणे राबवली आहेत. त्याविरुद्धची लढाई सुरु राहील. त्यासाठी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील छोटे पक्ष एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी हात पुढे केला, तर विचार करणार का, या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले की, मला आता कोणत्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा ती चूक करणार नाही.