Ahmednagar Politics : आ. राम शिंदे हे कर्ज मतदार संघात चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. विविध राजकीय गोष्टींमध्ये, निवडणुकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे.
त्यांनी त्यांचे राजकीय वजन पुन्हा सिद्ध केले आहे. कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून १३ संचालक बिनविरोध निवडून आलेत. हे सर्व आ. शिंदे यांच्यामुळे शक्य झाले आहे.

या तेरा जागांसाठी विविध मतदारसंघातून तब्बल ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सर्व १३ संचालक सर्वानुमते बिनविरोध केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली आहे.
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या १३ जागेसाठी ३६ अर्ज दाखल झाले होते. सर्वच अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरले. खरेदी विक्री संघात प्रामुख्याने डॉ. ए. बी. चेडे आणि प्रकाश चेडे यांचे प्राबल्य आहे. संस्था उर्जितावस्थेत आणण्याच्या उद्देशाने आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा चंग बांधला होता. त्यास चेडे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिंदे यांनाच निवडीचे सर्वाधिकार दिले. त्यांनी सर्व उमेदवारांशी चर्चा घडवत निवडणूक बिनविरोध केली. उर्वरित उमेदवारांना अर्ज माघे घेण्याची विनंती केली. त्यास सर्वांनी होकार दर्शवत खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली.
यासाठी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष डॉ. ए. बी. चेडे, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, अशोक खेडकर, बाजार समितीचे संचालक लहू वतारे, मंगेश जगताप, डॉ. सुनील गावडे, नितीन खेतमाळस, संपत बावडकर, डॉ. विजय हजारे यांचे सहकार्य लाभले.
नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे –
‘अ’ वर्ग सभासद सहकारी संस्था सर्वसाधारण : मछिंद्र कोल्हे, सुखदेव मुळीक, अण्णासाहेब महारनवर, सतीश सुद्रीक, रामदास सूर्यवंशी, राजेंद्र निकत. ‘ब’ वर्ग वैयक्त्तिक सभासद : सर्जेराव बावडकर, ज्ञानदेव गांगर्डे.
अनुसूचित जाती-जमाती : राजेंद्र त्र्यंबके, महिला राखीव: आशा अमृत बनकर, वैशाली चंद्रशेखर स्वरमरे, इतर मागास प्रवर्ग: प्रकाश चेडे. भटक्या, विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग: तुकाराम जवणे.