संगमनेर मध्ये आमदार अमोल खताळ करतायेत तरी काय ? एक रुपया निधी न आणता उद्घाटन….

Published on -

Sangamner News : मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी साठी 2024- 25 या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या सर्व कामांचे व निधीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची असून नवीन लोकप्रतिनिधीने एक रुपया निधी न आणता लोकनेते थोरात यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहन मा.जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी केले आहे.

घुलेवाडी गावातील विविध विकास कामांबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सिताराम राऊत यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीवरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सन 2024 25 या आर्थिक वर्षांमध्ये घुलेवाडी मधील विविध विकास कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला होता.

या कामाची प्रशासकीय मान्यता प्रशासकीय मंजुरीचे आदेश क्रमांक जीसकअ/ प्रमा क्रमांक 2/980 /2024–25 दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये घुलेवाडी गावठाण येथील पेव्हिंग ब्लॉक बसवणे ,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, बंदिस्त गटार ,काँक्रिटीकरण रस्ता, ब्लॉक बसवणे, रस्ता डांबरीकरण म्हसोबा नगर मधील विविध विकास कामे ,वीज पुरवठा, रस्ता मजबुतीकरण ,बंदिस्त गटार अशा कामांचा समावेश आहे .या सर्व कामांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा मिळाली आहे आणि त्या निधीतील ही सर्व काम आहेत.

मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक रुपयाचा नवीन निधी न आणता जुन्याच कामांचे उद्घाटन केले आहे. खरे तर नव्याने निधी आणून विकास कामे करायला हवी आहेत. मात्र नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त काही लोकांना हाताशी धरून जाहिरात बाजी करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.

आलेला निधी हा सर्व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळालेला आहे . याचे श्रेय कुणीही घेऊ नये असे आवाहन करताना याबाबतचे मंजुरीचे पत्र प्रसिद्धीस दिली असून नवीन लोकप्रतिनिधीने याचे उद्घाटन केले आहे या अत्यंत चुकीचे आहे.याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून यापुढे जुन्या कामांचे उद्घाटन केल्यास संपूर्ण गाव हे एकत्र येऊन त्या कामास विरोध करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

निधी आणा मग उद्घाटन करा

घुलेवाडी गाव हे मध्यवर्ती आहे लोकसंख्या मोठी असल्याने या गावासाठी मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत .पिण्याच्या पाण्याच्या सुविधा केल्या आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे ग्रामपंचायतने दिलेल्या मागणीनुसार 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांसाठी निधी मिळालेला आहे. मात्र नवीन लोकप्रतिनिधीला याबाबत काही माहिती नाही असे सांगताना निधी आणा मग उद्घाटन करा असे आव्हान लोकनियुक्त सरपंच सौ निर्मला राऊत यांनी दिले आहे.

घुलेवाडीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. आजही कोणती अडचण आली तरी ग्रामस्थ हे त्यांच्याकडे जात असतात. नवीन लोकप्रतिनिधी यांचा या कामांशी कोणताही संबंध नसताना विविध विकास कामांचे उद्घाटन केल्याने ग्रामस्थ व महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून युवकांनी याबाबत निषेध केला आहे. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एकमुखी निषेध व्यक्त केला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News