Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात आ. निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढलेले आहे. मागील काही दिवसापासून नगर च राजकरण म्हटलं की आ. लंके यांच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होत नाही. सध्या त्यांच्याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत.
ते विखेंविरोधात खासदारकी लढवणार, शरद पवार गटात जाणार, आ. लंके यांना आमदारकीलाच मोठी टक्कर मिळणार आदी चर्चा होत असतात. दरम्यान आता त्यांनी एक राजकीय वक्तव्य केलं आहे. या सूचक वक्तव्यानंतर मात्र चर्चांना आता जास्त उधाण आलं आहे.
* राजकारण ठरवून होत नसत, वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो..
आ. लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आलेले असताना पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. यात त्यांना तुम्ही खासदारकी लढवणार का असा प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना ते म्हणाले, “राजकारण आणि सोशल अॅक्टिव्हिटी यांचा कधी काही संबंध नसतो. माझी इच्छा आहे म्हणून लढवणं हे असं नसत , मी इच्छेसाठी कुठली गोष्ट करत नाही. राजकारण हे कधी ठरवून होत नसतं, वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो
व ऐनवेळी राजकारणात निर्णय घ्यावा लागतो असं सूचक वक्तव्य लंके यांनी करत सावध प्रतिक्रिया दिली. त्यानंतर चर्चाना पुन्हा वेग आला आहे. म्हणजे ते खासदारकी लढवणार का? किंवा खासदारकी लढवणं अजून फिक्सचं नाही ? असे विविध अर्थ काढले जात आहेत.
* पवार फॅमिलीने एकत्र यावं
यावेळी त्यांना आणखी एकी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आले पाहिजे का? तर यावर देखील सावध प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले “मलाच काय, उभ्या महाराष्ट्रला वाटतं पवार फॅमिलीने एकत्र यावं”,
व असच झालं पाहिजे असे ते म्हणाले. म्हणजेच पवार फॅमिली एकत्र असेल तरच महाराष्ट्रात राजकारण करणं सोपं जाईल असं लंके यांना सूचित करायचं होत असं महंत जात आहे.
* मुस्लिम बांधवांना दर्ग्याचे दर्शन
आ. लंके हे मतदार संघातील महिलांना मोहटा देवीचे दर्शन घडवत असतात. यावेळी त्यांनी यासोबतच मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांना खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घडवले. तसे नियोजन त्यांनी केले होते.
मतदार संघातील मुस्लिम महिलांनी दर्शनासाठी खेड शिवापूरच्या दर्ग्या येथे जायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी हे आयोजन करून त्यांना दर्शनासाठी आणलं, माझ्या मतदार संघातील अर्थात कुटुंबातील लोकांच्या इच्छा पूर्ती करणं माझं काम आहे असे ते म्हणाले.