श्रीरामपूर मतदारसंघात काय होणार, कोण बनणार पुढचा आमदार ? एक्झिट पोल काय सांगतो?

महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून सत्ता स्थापित करण्यासाठी 145 जागा आवश्यक आहेत. पण महायुती या मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचणार की महाविकास आघाडी ? हे सार काही 23 तारखेला क्लिअर होणार आहे. तत्पूर्वी मात्र सकाळच्या एक्झिट पोल मध्ये राज्यातील विविध मतदार संघांमध्ये कोण विजयी होणार? याबाबत अंदाज बांधला जात आहे.

Tejas B Shelar
Published:
Shrirampur Politics News

Shrirampur Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती. काल अखेरकार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा मतपेट्यांमध्ये कैद झाला असून येत्या 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

यामुळे या मतमोजणी मध्ये नेमके काय होणार, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, महायुतीला पुन्हा कौल मिळणार की महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे उलटफेर करणार अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सोबतच, आता विविध संस्थेचे एक्झिट पोल देखील समोर येत आहेत.

यातील काही एक्झिट पोल मध्ये महायुतीला आणि काही एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला बहुमत दाखवले जात आहे. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून सत्ता स्थापित करण्यासाठी 145 जागा आवश्यक आहेत. पण महायुती या मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचणार की महाविकास आघाडी ? हे सार काही 23 तारखेला क्लिअर होणार आहे.

तत्पूर्वी मात्र सकाळच्या एक्झिट पोल मध्ये राज्यातील विविध मतदार संघांमध्ये कोण विजयी होणार? याबाबत अंदाज बांधला जात आहे. या एक्झिट पोलमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक चर्चेतील आणि अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ. या ठिकाणी महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे हेमंत ओगले आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे लहू कानडे सोबतच शिंदे गटाचे कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अर्थातच श्रीरामपूरची निवडणूक ही तिरंगी झाली आहे. लहू कानडे यांची उमेदवारी काँग्रेसने कापली त्यामुळे त्यांनी काँग्रेसला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली आणि अजित पवार गटाने त्यांना येथून उमेदवारी दिली.

दुसरीकडे भाऊसाहेब कांबळे यांना देखील शिंदे गटाने उमेदवारी दिली. अर्थातच, या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आहे. पण आता या मतदारसंघातून कोण आमदार होणार? हा मोठा सवाल आहे.

याचे उत्तर साहजिकच मतमोजणीच्या दिवशी मिळणार आहे. पण तत्पूर्वी सकाळच्या एक्झिट पोल मध्ये या जागेवर काँग्रेस पक्षाचे हेमंत ओगले हे विजयी होतील असा अंदाज बांधण्यात आला आहे.

यामुळे आता या मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी काय होते, एक्झिट पोल मध्ये सांगितल्याप्रमाणे ओगले विजयी होतात की अजित पवार गटाचे लहू कानडे बाजी मारतात की शिंदे गटाचे कांबळे या दोघांना चितपट करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe