बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तर यावेळी या हत्ते मागील सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग मध्ये जाऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली यावेळी समवेत माझी मंत्री आमदार अमित देशमुख हे होते.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटनाही अत्यंत वेदनादायी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ते मागील गुन्हेगारांना त्वरित शोधून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. बीड जिल्ह्यासह राज्यात दहशत वाढवण्यासाठी कारणीभूत कोण आहे आणि यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे या गोष्टींची सुद्धा सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी. गुन्हेगारांना जात धर्म काही नसून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी व फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून दोशींना कठोर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे.
गुन्हेगारांवर कायद्याचा धाक असावा लागतो .मात्र सध्या प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना आहेत की साध्या एफ आर आय सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेतल्या जात नाहीत अत्यंत दुर्दैवी आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही अत्यंत वेदनादायी असून या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव उभा राहील असेही ते म्हणाले.
तर माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की परभणी आणि बीड येथील घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारे आहे. या दोन्ही ठिकाणच्या गुन्हेगारांना तातडीने अटक करावी व पिढीत कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व अमित देशमुख यांचे मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.