Ahmednagar Politics : विखे पाटील गटाला होमग्राउंडवरच धक्का, मोठा पराभव होत 20 वर्षांपासूनची सत्ता गेली !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अलीकडील काही दिवसांत त्यांच्याच होमपीचवर शह मिळाले आहेत.

गणेश कारखान्यात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या गटाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या होत्या.

या निवडणुकीत विखे पाटील गटाचा पराजय झाला आहे. 17 पैकी 17 जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने या सर्व जागा जिनिक घेत विजय मिळवला.

या संस्थेमध्ये 20 वर्षांपासून विखे पाटील समर्थकांची सत्ता असल्याने हा लागलेला सुरुंग विखे पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

११ फेब्रुवारी अर्थात काल प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूक होत मतमोजणीची झाली. यात हा निकाल लागत सत्ता परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले.

साईबाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल ही 150 कोटींवर असल्याने या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

परंतु यात विखेंच्या समर्थक पॅनलला एका जागेवरही विजय मिळालेला नाही. हा होमपीचवरील पराभव विखे पाटील गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.

या निवडणुकीत १७ जागा होत्या व या जागांसाठी 53 उमेदवार उभे होते व 1650 सभासदांनी या निवडणुकीसाठी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे.

विखे पाटील यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार एकामॆनासमोर आव्हान देत ठाकले होते. विठ्ठल पवार यांच्या विकास पॅनलने या दोन्ही पॅनलला आव्हान देत आपला पॅनल उभा केला होता.

विखे पाटील समर्थक प्रताप कोते यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅमल तर संस्थेचे माजी चेअरमन आणि विखे पाटलांचे समर्थक राजेंद्र जगताप याच्या नेतृत्वाखाली साई हनुमान मंडळ हा दुसरा पॅनल उभा ठाकलेला होता.

परंतु या निवडणुकीत सभासदांनी विठ्ठल पवार यांच्या पॅनलचा पसंती दिली व त्यामुळे सर्व जागा जिंकत त्यांनी त्याठिकाणी विजय मिळवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe