Ahmednagar Politics : तालुक्यात ‘साकळाई योजना व कांदा प्रश्नी विरोधकांकडून विष पेरण्याचे काम सुरू आहे. चाळीस वर्षांमध्ये कोणीही साकळाई कागदावर आणू शकला नाही.
फक्त आंदोलन व रास्तारोको केले. त्याच साकळाई योजनेबाबत विरोधकांकडून विष पेरण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका खासदार सुजय विखे यांनी केली.
जिल्हा खरेदी विक्री संघ तसेच तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आलेल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तसेच भिंगार अबंन बँकेचे नूतन संचालक व पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकांचाही सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना खासदार विखे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
आजपर्यंत कोणीही साकळाई योजनेसाठी आंदोलना व्यतिरिक्त काही केले नाही. परंतु माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांच्या सहकार्याने आम्ही साकळाईच्या सव्हेंसाठी मंजुरी आणली.
खासदार ‘ विखे यांनी साकळाई योजना मंजूर केली तर हिम्मत असेल तर राजकीय संन्यास घेऊ असे जाहीर करावे. असे खुले आव्हान विखे यांनी विरोधकांना दिले.
कांद्याच्या निर्यात प्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांना दोन वेळेस भेटणारा एकमेव खासदार विखेच आहे. शहांसमोर तीन वर्षांची आकडेवारी दाखवून कांद्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
आठवड्यात कांदा प्रश्नी केंद्र सरकार नक्कीच चांगला निर्णय घेईल असा विश्वासही विखे यांना बोलून दाखवला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बोलताना खरेदी विक्री संघासाठी विरोधकांना उमेदवारच मिळाले नाही.
अन् स्व. दादा पाटील शेळके यांच्या नावाने महानभतो मिळविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा होती त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे समजते असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, युवानेते प्रतापसिंह पाचपुते, मार्केट कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे, उपाध्यक्ष रभाजी सुळ, चेअरमन शिवाजीराव झोडगे, चेअरमन सुरेश सुंबे, अभिलाष घिगे,
रावसाहेब शेळके, बाजीराव गवारे, हरिभाऊ कर्डिले, दादाभाऊ चितळकर, रेवननाथ चोभे, दीपक कार्ले, विजय शेवाळे, राम ‘पानमळकर, अनिल करांडे, रवींद्र कडूस, वैभव खलाटे,
एकनाथ आटकर, पोपट कराळे, जिजाबापू लोंढे यांच्यासह नगर, पाथर्डी, कर्जत तालुका संघाचे संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.
साडेचार वर्षात जे बोलत नव्हते ते आता बोलायला लागले आहेत. विविध आरोप करत आहेत. त्यांना काय पाहिजे ते मला चांगलेच माहिती आहे.
त्यांच्या मागणीचा योग्य वेळी पुरवठा केला जाईल. त्यांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांचा सर्व आटापिटा कशासाठी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. असे खासदार विखे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.