Ahmednagar Politics : निलेश लंके आधी काम करतो अन मगच सांगतो.पण काही नेतेमंडळी विकास कामासाठी निधीची घोषणा करून मोकळे होणार होतात. ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे ते परत फिरकतच नाही असा आ. निलेश लंके यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला.
श्रीगोंदा येथे माजी सैनिकांच्या पुढाकारातून शहीद स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. निलेश लंके यांनी खा. विखे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी आ. बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी स्मारकाबाबत आपली भूमिका मांडत असताना नगर दक्षिणचे खा.डॉ.सुजय विखे यांनी या स्मारकासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचा निरोप माझ्याकडे दिला आहे. आ. निलेश लंके यांनी आपल्या भाषणात आपल्या जिल्ह्यात निधीची घोषणा करणारे बरीच मंडळी आहेत.
या भागातही त्यांनी येऊन अनेकदा निधी देण्याची घोषणा केली. पण निधी देण्याची घोषणा करणारे परत तिकडे फिरकतच नाहीत. हे वास्तव नाकारून चालणार नाही. अण्णासाहेब शेलार तुम्ही पंधरा लाखाची घोषणा केली खरी पण पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.
मग निधी कुठून देणार ? जनता हुशार आहे .घोषणा करा पण लोकांच्या पचनी पडतील अशा करा. निलेश लंके घोषणा करत नाही आधी काम करतो अन मग सांगतो. या शहीद स्मारकाच्या उभारणीसाठी मला माझ्या आमदार निधीतुन पैसे देता येत नसले
तरी स्मारक उभारणीच्या कामासाठी माझा हातभार लागेल अशी खात्री बाळगा असे सांगत श्रीगोंदा येथे उभा राहत असलेले शहीद स्मारक नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. असे स्मारक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभे राहणे गरजेचे आहे. असेही लंके यावेळी म्हणाले.