Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात सोनई या ठिकाणी शिवसेनेचा संवाद मेळावा आज (१३ फेब्रुवारी) पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला.
यावेळी त्यांनी आ. शंकरराव गडाख यांचे कौतुकही केले. त्याचप्रमाणे यावेळी सोनईकरांनी उद्धव ठाकरे यांचे केलेलं भव्य स्वागत पाहून राऊत भारावून गेले.
याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंचे स्वागत प्रचंड भव्य झाले असून आमची गाडी पुढे जात नव्हती. आपण खाली उतरला तेव्हा मला वाटले लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन डोक्यावर घेतील की काय? पण जनतेने एकट्या तुम्हाला डोक्यावर घेतले, बाकी सगळे गेले हे देखील खरे असल्याचे राऊत म्हणाले.
‘हा ‘शंकर’ आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा
जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आले त्यांनी गद्दारी केली. परंतु हा शंकर आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आलेले सोडून गेले परंतु गडाख हे मात्र अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत उभे आहेत.
‘हा ‘शंकर’ आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा असे म्हणत त्यांनी आ. शंकरराव गडाख यांचे कौतुक केले.
अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावरूनही टोलेबाजी
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यावरून संजय राऊत यांनी चौफेर टोलेबाजी केली. अशोक चव्हाण चांगला माणूस होते, तसेच पक्षाने देखील त्यांना भरभरून दिले परंतु तरीही अशोक चव्हाण हे सोडून गेले.
सर्वात मोठा घोटाळा हा आदर्श घोटाळा असल्याचे भपणेच म्हटले होते आणि आता भाजपनेच त्यांना पक्षात घेतले असून आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा असा घणाघात केला.
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलथून टाकून रामराज्य आणायचे आहे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे भाजप हे लोकसभेत 200 जागेंच्या पुढेही जाणार नाहीत.
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणार नसून आता उद्धव ठाकरे यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करण्यासाठी खुणावत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.